नवाज शरीफ यांच्यावर हल्ला झाल्याने खळबळ

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावावर मतदान होण्याच्या एकदिवस आधीच हा हल्ला झाला आहे.
Nawaz Sharif
Nawaz SharifSarkarnama

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaj Sharif) यांच्या लंडनमध्ये हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाकिस्तानात (Pakistan) खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधातील अविश्वास ठरावावर मतदान होण्याच्या एकदिवस आधीच हा हल्ला झाला आहे. शरीफ यांची मुलगी मरियम (Maryam Nawaj Sharif) यांनी इम्रान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफ या पक्षाच्या कार्यकर्त्यानेच हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय संघर्ष पेटला आहे. इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव संसदेने (Parliament) फेटाळल्यानंतर राष्ट्रपतींनी संसद बराखस्त केली आहे. इम्रान यांनीच ही शिफारस केली होती. आता विरोधक सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. पण या घडामोडींच्या एक दिवस आधी लंडनमध्ये असलेल्या नवाज शरीफ यांच्यावर शनिवारी त्यांच्या कार्यालयाबाहेरच हल्ला झाल्याचे उघड झाले आहे.

Nawaz Sharif
विरोधक सर्वोच्च न्यायालयात जाण्याआधीच राष्ट्रपतींची पंतप्रधानांच्या शिफारशीवर मोहोर

मरियम यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. एका तरूणाने नवाज शरीफ यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर सुरक्षारक्षकाने रोखल्याने मोबाईल फोनने सुरक्षारक्षकावर हल्ला केला. तो जखमी झाला आहे, असं मरियम यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. पीटीआयचे लोक आता हिंसेचे आसरा घेत आहे. ते कायदा हातात घेत आहेत. त्यांना अटक करायला हवी. इम्रान खान यांना देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करायला हवे. यातील कुणालाही सोडता कामा नये, असं मरियम यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी पत्रकार अहमद नूरानी यांनी आपल्या ट्विटरवरून हल्ल्याची माहिती दिली आहे.

नवाज शरीफ यांच्या पीटीआयच्या कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा नूरानी यांनी केला आहे. पाकिस्तानात पीटीआयविरोधात कारवाई व्हायला हवी. कारण आता या पक्षाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. शारिरीक हिंसेला कधीच माफ केले जाऊ शकत नाही. पीटीआयला आता एक उदाहरण बनवायला हवे, असेही नूरानी यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानातील राजकारणही तापले असून मरियम यांच्या पक्षाने पीटीआय विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

Nawaz Sharif
'अच्छे दिन'चं वारं पाकिस्तानातही; माजी पंतप्रधानांच्या मुलीचे सुचक संकेत

इम्रान खान यांच्यावरील अविश्वास ठराव रविवारी संसदेनं फेटाळून लावला. हा ठराव घटनाबाह्य असल्याचे सांगत संसदेच्या उपसभापतींनी ठराव फेटाळून लावला. पण त्याआधीच संसदेत येण्याऐवजी इम्रान खान हे राष्ट्रपतींच्या भेटीला गेल होते. यावेळी त्यांनी संसद बरखास्त करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर काही वेळातच राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी ही शिफारस मान्य करत संसद बरखास्त केली. त्यामुळे आता पाकिस्तानात मध्यावधी निवडणुकांची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com