धक्कादायक! नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

Navneet Rana| Ravi Rana| खासदार नवनीत राणा यांना यापुर्वीही धमकी देण्यात आली होती.
Navneet Rana|
Navneet Rana|

नवी दिल्ली : अमरावतीच्या (Navneet Rana) यांच्याबाबत एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण केल्यास तुम्हाला ठार मारू, अशी धमकी आल्याची तक्रार नवनीत राणा यांनी केली आहे. एका मुस्लिम धर्मगुरू कडून फोन कॉल आल्याची माहिती नवनीत राणा यांनी पोलिसांना दिली आहे.

या प्रकरणी राणांनी नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हनुमान चालीसा पठणावरून गेल्या अनेक दिवसांपासून खासदार नवनीत राणा या वादात सापडल्या आहेत. यामुळे त्यांना तुरुंगाची वारीही करावी लागली.

Navneet Rana|
राणा दांपत्य विरुद्ध राष्ट्रवादी सामना: एकाच मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार

खासदार नवनीत राणा यांना यापुर्वीही धमकी देण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी एका अज्ञाताने नवनीत राणा यांच्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर गेल्या वेळी शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर धमकीचे पत्र असल्यामुळे राजकीय वर्तुळातही या चर्चांना उधाण आले होते. मात्र या धमकीच्या पत्रात कोणत्याही नेत्याचे नाव मात्र नव्हते. मात्र, नवनीत राणांनी या लेटरहेडवरुन शिवसेनेनंच धमकी दिल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली होती. शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या इशाऱ्यावर ही धमकी पाठवल्याचा दावा त्यांनी राणांनी केला होता.

दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राणा दांपत्य पहिल्यांदाच विदर्भाचा दौरा करणार आहेत. 28 मे रोजी ते नागपूरला जाणार आहेत. नागपुरात गेल्यानंतर ते पून्हा राम मंदिरात हनुमान चालिसा पठण आणि हनुमान आरती व महापूजा करणार आहेत. त्यानंतर ते अमरावतीला जातील.

28 मे रोजी नागपुरात नवनीत राणा यांच्या हनुमान आरतीच्या वेळेस राष्ट्रवादी कॉंग्रेस महागाई विरोधात आंदोलन करणार आहे. नवनीत राणा ज्या मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्याचं रामनगर हनुमान मंदिरात राष्ट्रवादी कॉंग्रेस महागाईविरोधात आंदोलन करणार आहे. राज्यावरील महागाईचं संकट जावं म्हणून राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्यामुळे मंदिरात एकाच वेळी राष्ट्रवादी आणि नवनीत राणा यांच्याकडून हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे, यामुळे हा सामना चांगलाच रंगणार असल्याची चर्चा सध्या नागपूरात सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com