नवज्योत सिंग सिद्धूचे कॉंग्रेसमधील भविष्य धोक्यात; पक्षातून हकालपट्टी होणार?

Navjot Singh Sidhu news कामे केल्याने त्यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
Navjot Singh Sidhu news
Navjot Singh Sidhu news

Navjot Singh Sidhu Political Future

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे पंजाब कॉंग्रेसमधील (Congress) भविष्य संपुष्टात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. पक्षाविरोधात कामे केल्याने त्यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. त्यातच काँग्रेस हायकमांड नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यावर खूप नाराज असल्याची चर्चा असल्याने पक्षाकडून कधीही सिद्धू यांच्यावर कारवाई होऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.

Navjot Singh Sidhu news
मोठी बातमी : भारतातील मुस्लिमांची संख्या वाढत नसून घटतेय!

नवज्योत सिंग सिद्धू कॅप्टन अमरिंदर सिंग आणि चरणजीत चन्नीपासून ते सुखजिंदर रंधावा, सुनील जाखड आणि पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वाडिंग या सर्वांविरोधात वक्तव्ये करत असल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. तत्पुर्वी नवज्योत सिंग सिद्धू पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेणार आहेत. सिद्धू यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली असून पंजाबच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सिद्धू यांचे काँग्रेसमधील राजकीय भवितव्य संपले आहे, असा अंदाज काँग्रेस पक्षातील सूत्रांकडून वर्तविला जात असला, तरी त्यांच्या राजकीय भविष्यातील पुढील खेळीबाबत ते भगवंत मान यांची भेट घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

नवज्योतसिंग सिद्धूबद्दल सुरुवातीला त्यांच्या स्वभावामुळे आणि बोलण्यामुळे त्यांना पक्षात कोणी नेता करत नाहीत, पण लोक त्यांना पसंत करतात आणि ते त्यांच्यासोबत आहेत, असा सुरवातीला समज होता. मात्र 2022 च्या विधानसभा निवडणुकीत सिद्धूचा हा हेतु समोर आला. आणि त्यांना आपली आमदारकी गमवावी लागली. यासोबतच नवज्योत सिद्धू यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले आणि त्यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्षपदही गमवावे लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com