पंजाबमध्ये पुन्हा एकदा सिद्धू विरुद्ध कॅप्टन थेट सामना

पंजाबच्या (Punjab) विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) 86 उमेदवारांची यादी काँग्रेसने (Congress) जाहीर केली आहे.
Amarinder Singh and Navjot Singh Sidhu
Amarinder Singh and Navjot Singh Sidhu Sarkarnama

नवी दिल्ली : पंजाबच्या (Punjab) विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) 86 उमेदवारांची यादी काँग्रेसने (Congress) जाहीर केली आहे. यात प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) हे अमृतसर पूर्वमधून लढणार आहेत. विशेष म्हणजे सिद्धूंचे कट्टर वैरी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. या लढतीकडे आतापासूनच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसने आज जाहीर केलेल्या 86 उमेदवारांच्या यादीत मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी हे राखीव चमकौर साहिब मतदारसंघातून मैदानात उतरणार आहेत. यादीत प्रतापसिंग बाजवा (काडियन), सुखजिंदरसिंग रंधावा (डेरा बाबा नानक), परगतसिंग (जालंधर कॅन्टोन्मेंट) या बड्या नेत्यांचा समावेश आहे. मागील वर्षभर अमरिंदरसिंग विरुद्ध सिद्धू असा वाद काँग्रेसमध्ये सुरू होता. यात अमरिंदरसिंग यांना सुरवातीला मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. नंतर त्यांनी पक्षाला रामराम केला होता.

Amarinder Singh and Navjot Singh Sidhu
भाजप नेत्यांना पक्षात प्रवेश नाही! अखिलेश यादवांची मोठी घोषणा

अमरिंदरसिंग यांनी आता काँग्रेस विरोधात शड्डू ठोकला आहे. त्यांनी पंजाब लोक काँग्रेस (Punjab Lok Congress) हा नवीन पक्ष स्थापन केला आहे. राज्यात पुढील महिन्यात होणाऱ्या भाजपसोबत (BJP) त्यांचा पक्ष मैदानात उतरला आहे. आता या पक्षाला निवडणूक आयोगाने हॉकी स्टिक आणि बॉलचे चिन्ह मिळाले आहे. कॅप्टन यांनी नवीन पक्षाचे नाव पंजाब लोक काँग्रेस, असे जाहीर केले होते. त्यांनी नावात काँग्रेसचा वापर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता त्यांना हॉकी स्टिकसह बॉलचे चिन्ह मिळाले आहे. पंजाबमधील हॉकीच्या लोकप्रियतेचा फायदा त्यांना काही प्रमाणात होऊ शकतो.

Amarinder Singh and Navjot Singh Sidhu
अखेर ठरलं! अयोध्या अन् मथुरेकडे पाठ फिरवून योगी सुरक्षित मतदारसंघात!

दरम्यान, 2017 मध्ये झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते. काँग्रेसने 117 पैकी 77 जागा मिळवत अकाली दल व भाजप आघाडीकडून सत्ता काबीज केली होती. हे दोन पक्ष सलग दहा वर्षे सत्तेत होते. या निवडणुकीत आम आदमी पक्ष (AAP) 20 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. तर अकाली दलाला 15 आणि भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com