पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धूंचे बल्ले बल्ले! - navjot singh sidhu may be named as punjab congress chief | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धूंचे बल्ले बल्ले!

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जुलै 2021

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू आहे. यावर अखेर पक्ष नेतृत्वाने हा पर्याय शोधला आहे.  

नवी दिल्ली : पंजाब (Punjab)  काँगेसमधील (Congress) संघर्षावर हाय कमांडने अखेर तोडगा शोधला आहे. काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांच्यावर आता प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू आहे. यावर अखेर पक्ष नेतृत्वाने हा पर्याय शोधला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

पंजाबमधील अंतर्गत वाद पक्षाला विधानसभा निवडणुकीच्या आधी परवडणारा नाही. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले होती. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली होती. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम होते. अखेर सिद्धू यांची मागणी पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना हटलवे जाईल. सिद्धू यांच्यासोबत दोन कार्यकारी अध्यक्ष दिले जातील. यातील एक दलित आणि एक हिंदू असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सिद्धू हे 30 जूनला प्रियांका यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर त्या पहिल्यांदा राहुल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटल्या होत्या. नंतर त्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. या सर्व घडामोडी सुरू होत्या त्यावेळी सिद्धू हे प्रियांका यांच्याच निवासस्थानी होते. सिद्धू यांना भेट न दिल्यास अंतर्गत कलह आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे प्रियांका यांनी या प्रकरणी पुढाकार घेतला होता. यानंतर राहुल आणि सिद्धू यांची भेट झाली होती. 

दरम्यान, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींची नुकतीच भेट घेतली होती. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग चॉपरने दिल्लीत दाखल झाले होते. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यामुळे त्याआधी पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी ही भेट होती. सिद्धू यांना राज्यात मोठे पद दिले जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात आहे. पक्षांतर्गत वादाचा फटका आगामी निवडणुकांत बसू नये म्हणून आता पक्ष नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : राणेंना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी कुणामुळे? खुद्द त्यांनीच केला उलगडा 

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसमधील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने जोरदार खडाजंगी होत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसते. सिद्धू यांची लोकप्रियता जास्त असल्याने पक्ष नेतृत्वालाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अवघड बनले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख