ED : व्यवहारांची जबाबदारी राहुल गांधींनी (कै.) मोतीलाल व्होरांवर ढकलली ; चौकशी लांबणार

यंग इंडियन आणि एजेएल लि. यांच्यातील प्रत्येक व्यवहारांची फक्त काँग्रेसचे खजिनदार मोतीलाल व्होरा यांनाच माहिती होता, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
ED :  व्यवहारांची जबाबदारी  राहुल गांधींनी  (कै.) मोतीलाल व्होरांवर ढकलली ; चौकशी लांबणार
Motilal Vora, rahul gandhisarkarnama

नवी दिल्ली : तीन दिवसापासून काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांची चौकशी (national herald case) होत आहे. आता उद्या (शुक्रवारी) त्यांची चौकशी होणार आहे. आत्तापर्यंत राहुल गांधींना ईडीनं फक्त ५० टक्केच प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे ही चौकशी अजून लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. (rahul gandhi ed inquiry)

ईडीच्या चौकशीत राहुल गांधी यांनी अधिकाऱ्यांना असमाधानकारक उत्तर दिल्याचे सुत्रांनी सांगितले. तर दुसरीकडे काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तन्खा यांनी राहुल गांधी यांच्या प्रश्नासंबंधीची माहिती लीक झाल्यानंतर गृह मंत्रालय, वित्त मंत्रालय आणि कायदा मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे.

गुरुवारी ईडीने राहुल गांधी यांना चौकशीतून ब्रेक दिला आहे. परंतु गेल्या दोन दिवसात ईडी अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत राहुल गांधींनी नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग केस मधील इंडियन आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड यांच्यातील सर्व व्यवहारांची जबाबदारी काँग्रेसचे माजी खजिनदार (कै.)मोतीलाल व्होरा (Motilal Vora) यांच्यावर ढकलली आहे. ईडीमधील सूत्रांच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. गेल्या वर्षी व्होरा यांचे निधन झाले आहे.

Motilal Vora, rahul gandhi
नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा दणका ; नोटीस योग्यच

राहुल गांधींनी ईडी चौकशी दरम्यान इंडियन कंपनी आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड अर्थात एजेएल यांच्यातील कुठल्याही व्यवहारांची माहिती आपल्याला व्यक्तिगत पातळीवर नसल्याची नसल्याचा दावा चौकशीत केला आहे. यंग इंडियन आणि एजेएल लि. यांच्यातील प्रत्येक व्यवहार फक्त काँग्रेसचे खजिनदार मोतीलाल व्होरा यांनाच माहिती होता, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी आत्तापर्यंत तीस तासाहून अधिक काळ चौकशी करण्यात आली आहे. काल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारात ते ईडीच्या कार्यालयात गेले होते. त्यानंतर रात्री उशीरा ते परत आले. त्यांना अटक झाल्याची अफवा काल पसरली होती. आज ईडीच्या विरोधात मुंबईत राजभवनावर काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला याच अनेक मोठे नेते सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in