भाजपचा दे धक्का; जम्मूतील दोन बडे नेते पक्षाच्या वाटेवर

जम्मू-काश्मीरमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
भाजपचा दे धक्का; जम्मूतील दोन बडे नेते पक्षाच्या वाटेवर
BJP

जम्मू : जम्मू व काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून पहिला धक्का माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला व ओमर अब्दुल्ला यांना दिला आहे. नॅशनल कॉन्फरन्समधील दोन बड्या नेत्यांनी रविवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हे दोन्ही नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे जम्मू प्रांताचे अध्यक्ष असलेले देवेंद्रे सिंह राणा व माजी मंत्री सुरजित सिंह सलाथिया यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. राणा हे पक्षाचे जम्मूतील चेहरा होते. तसेच पक्षाच्या काही बड्या नेत्यांपैकी ते एक होते. ओमर अब्दुला यांच्या विश्वासू सहकाऱ्यांमध्ये त्यांचे नाव होते. तसेच राणा हे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचे बंधू आहेत. त्यामुळेच ते भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झालं आहे. पुढील एक-दोन दिवसांत ते भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

BJP
आमच्या 19 आमदारांशिवाय मुख्यमंत्री कसं बनाल? काँग्रेसनं दाखवला आरसा

मागील काही दिवसांपासून राणा यांनी पक्षातून बाहेर पडण्याबाबत चर्चा होती. त्यांनी मागील आठवड्यात बुधवारी पक्षाचे अध्यक्ष फारूख अब्दुला व उपाध्यक्ष ओमर अब्दुला यांची भेटही घेतली होती. सुमारे दोन तास त्यांच्या बैठक चालली होती. या बैठकीत विविध मुद्यांसह त्यांच्या पक्ष सोडण्याच्या शक्यतांवरही चर्चा झाली होती.

या भेटीनंतर राणा म्हणाले होते की, जम्मूच्या हिताशी समझोता केला जाणार नाही. जम्मूतील लोक विकास, रोजगार, सुशासन आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये समान अधिकार मागत आहेत. त्यासाठी झुकता कामा नये. जम्मूच्या हिताला सतत कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण जाती-धर्मामध्ये भेदभाव न करता लोकांना शांतीपूर्ण आणि लोकशाही मार्गाने आपला संकल्प केला आहे.

जम्मूच्या हिताशी समझोता करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचे आता काहीही परिणाम होवोत. जम्मूकडं दुर्लक्ष करणे म्हणजे स्वाभिमानी लोकांना अपमान करण्यासारखे आहे. ते लोक अनेक वर्षांपासून सोबत आहेत. आम्ही विविधतेत एकता व जम्मू-काश्मीरचे राजकीय वाहक आहोत. या भावनेत कोणीच अडथळे आणू शकत नाही, असंही राणा म्हणाले होते.

Related Stories

No stories found.