पंतप्रधानपदी निवड होताच ऋषी सुनक यांना नरेंद्र मोंदीनी दिल्या शुभेच्छा

Rishi Sunak | ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक यांची ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून घोषणा झाली.
पंतप्रधानपदी निवड होताच ऋषी सुनक यांना 
नरेंद्र मोंदीनी दिल्या शुभेच्छा

Rishi Sunak : ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक (Rishi Sunak) यांची ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून घोषणा झाली. सुनक यांच्या रुपाने ब्रिटनच्या पंतप्रधानपदी पहिल्यांदा निवड झाल्याने एक नवा इतिहास रचला गेला. गेल्या चार वर्षांतले ऋषी सुनक हे पाचवे पंतप्रधान आहेत. सुनक यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषी सुनक यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनक यांची निवड झाल्यानंतर काही तासांनी केलेल्या ट्वीटमध्ये सुनक यांना टॅग करत त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऋषी सुनक पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन. जागतिक मुद्दे हाताळण्याबरोबरच द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी उत्सुक आहोत, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. २०३० पर्यंतची वाटचाल कशी असावी, यासंदर्भातील योजना अंमलात आणण्याचा आमचा विचार आहे,” असं ट्विट करत पंतप्रधान मोदींनी सुनक यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानपदी निवड होताच ऋषी सुनक यांना 
नरेंद्र मोंदीनी दिल्या शुभेच्छा
Rishi Sunak : ऋषी सुनक यांच्या रूपाने भारतीय वंशाची दुसरी व्यक्ती पंतप्रधानपदी!

ऋषी सुनक शिवाय ते माजी अर्थमंत्रीही आहेत. पंतप्रधानपदासाठी सत्ताधारी हुजूर पक्षात पेनी मॉरडाँट आणि ऋषी सुनक यांच्यात शर्यत होती. हुजूर पक्षाच्या ३५७ खासदारांपैकी १४२ जणांनी सुनक यांनी पाठिंबा दिला. तर मॉरडाँट यांच्याकडे २९ सदस्यांनी पाठिंबा दिवा होता. पण पंतप्रधान पदासाठी आवश्यक असलेला किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळणे आवश्यक होते, हा पाठिंबा मिळणे अशक्यप्राय असल्याचे लक्षात येाच मॉरडाँट यांनीही माघार घेतली. त्यानंतर हुजूर पक्षाचे नवे नेते म्हणून ऋषी सुनक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. केवळ दीड महिन्याच्या कालावधीत 45 दिवसांत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. लिझ ट्रस या ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधी लाभलेल्या पंतप्रधान ठरल्या. त्यानंतर झालेल्या निवडीमध्ये सुनक पंतप्रधान झाले आहेत. काही दिवसापूर्वी लिझ ट्रस यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, लिझ ट्रस यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा सुनक याना संधी मिळाली. सुनक यांच्या रुपाने ब्रिटनमध्ये पहिल्यादांच भारतीय वंशाचा पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे ही भारतासाठीही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com