Amit Shah : 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचं मोठं विधान, म्हणाले...

Amit Shah : भाजपची आज महत्वपूर्ण बैठक
Amit Shah
Amit Shah Sarkarnama

Narendra Modi : ''गुजरातच्या यशामुळे नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होतील'', असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत मिळाले. तर येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी हे मत व्यक्त केले आहे.

अमित शाह म्हणाले, ''गुजरात विधानसभेचा निकाल हा केवळ राज्यासाठी नाही तर पूर्ण देशासाठी महत्त्वाचा आहे. याचे कारण म्हणजे 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून येतील, असा संदेश गुजरात विधानसभेच्या निवडणुकीतून मिळाला आहे'', असे शाह म्हणाले.

Amit Shah
G-20 परिषदांसाठी परदेशी पाहुणे पोहोचले पुण्यात, सरकारकडून खास 'वेलकम डिनर'!

तसेच यावेळी त्यांनी काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्षाबाबत (Aam Aadmi Party) देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले, ''गुजरातच्या जनतेने भाजपला राज्यात विक्रमी जागांवर विजयी करून सत्ता राखण्यास मदत केली. यामाध्यमातून त्यांनी गुजरात आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे'', असं ते म्हणाले. दरम्यान, अमित शाह यांच्या या विधानामुळे भाजप 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले असल्याचे बोलले जात आहे.

Amit Shah
Nitin Gadkari News : गडकरींनी धमकी देणाऱ्या गुंडाची ती डायरी पोलिसांच्या हाती ; आणखी काही जणांना धमकीचे फोन..

भाजपची आज महत्वपूर्ण बैठक

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्त्वाची बैठक आज दिल्लीत पार पडणार आहे. ही बैठक दोन दिवस चालणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत भाजप 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती आखणार असल्याचं बोललं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com