Narendra Modi News : 'विरोधकांनी EVM ला शिव्या दिल्या का?' : मोदींनी काढला चिमटा!

Narendra Modi News : तीन राज्यांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी विरोधकांना डिवचलं!
Narendra Modi News :
Narendra Modi News :Sarkarnama

Narendra Modi News : ईशान्यमधील तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्व जागांच्या निकाल लागले चित्र स्पष्ट होत आहे. त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपने गड राखला आहे, तर मेघालयात त्रिशंकुची परिस्थिती निर्माण झाली आहे. आजच्या या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या यशाचे रहस्य सांगितले आहे.

Narendra Modi News :
Nagaland Election Results : नागालँडमध्ये राष्ट्रवादीची हवा; ७ जागांवर दणदणीत विजय

पंतप्रधान मोदी म्हणाले, भाजपच्या सततच्या विजयामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. ते म्हणतात की, भाजपच्या विजयाच्या रहस्य काय आहे. मी अजूनही टिव्ही लावून पाहिला नाही. म्हणून, विरोधक ईव्हीएमला दोष देत आहेत का? याची मला माहिती नाही, असा चिमटा मोदींनी आजच्या निकालाच्या पार्श्वभूमिवर काढला.

Narendra Modi News :
Kasba Peth Election Result : बापट-टिळकांच्या पाठीशी असलेले मतदार हेमंत रासनेंच्या मागे का उभे राहिले नाही?

मोदी यांनी भाजपच्या यशाचे रहस्य सांगितले, "भाजप सरकारचं काम, भाजप सरकरची कार्यसंसकृती, आणि भाजपचा सेवाभाव , या त्रिवेणी संगमामुळे भाजपचा सातत्याने विजय होत आहे. हे त्रिवेणी संगम मिळून भाजपला यश मिळवून देते. आम्ही देशाला एक राजकीय संस्कृती दिली. या देशाला विकासाचं मॉडेल देशाला दिला. भाजप सरकारच्या कामात भेदभाव नसतो. आमच्यासाठी 'एक भारत - श्रेष्ठ भारत' हे त्रिसूत्री आहे. आमच्यासाठी देश प्रथम आहे, देशवासी प्रथम आहे, असे मोदी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com