Narendra Modi : मोदी म्हणतात, 'मी थकत नाही कारण, रोज दोन-अडीच किलो शिव्या खातो.'

Narendra Modi : आधी गरिबांना मिळण्याऱ्या पैशांमध्ये आणि रेशनमध्ये फसवणूक केली जात होती.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री राव यांच्यावर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणाचा आरोप केला. ते म्हणाले की, राज्याला प्रथम माणसांची गरज आहे, कुटुंबाची नाही.

Narendra Modi
Rajiv Gandhi : राजीव गांधी यांच्या हत्येतील 6 आरोपी तुरूंगातून बाहेर, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश!

पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधी पक्ष राजकीय मोट बांधण्याच्या प्रयत्न करीत आहेत, कारण त्यांना यंत्रणांद्वारे त्यांच्याविरूद्ध भ्रष्टाचाराच्या चौकशीची भीती आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताना मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन पेमेंटवर भर दिल्याने भ्रष्टाचारात लक्षणीय घट झाली आहे. कारण अशा व्यवहारांचा मागोवा घेतला जाऊ शकतो.

मोदी म्हणाले, “जन धन योजना, आधार कार्ड आणि मोबाईल या त्रिशक्तीच्या माध्यमातून आम्ही सर्व भोगस लाभार्थींना दूर करण्यात सक्षम आहोत. गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत. आधी गरिबांना मिळण्याऱ्या पैशांमध्ये आणि रेशनमध्ये फसवणूक केली जात होती. या माध्यमातून त्यांना लुटले जात होते,”

Narendra Modi
Gujrat Election : 10 लाख नोकऱ्या, 300 युनिट वीज मोफत : गुजरातसाठी काँग्रेसचा जाहीरनामा!

मोदी पुढे म्हणाले की, बरेच लोक मला विचारतात की मी थकून कसा जात नाही. मी त्यांना म्हणतो, "मला कंटाळा येत नाही, कारण मी दररोज दोन ते अडीच किलो शिव्या खातो. देवाने मला असा आशीर्वाद दिला आहे की ते माझ्यातील पोषणात रुपांतरित होते."

मला शिव्या द्या, भाजपला शिव्या द्या, पण तुम्ही तेलंगणातील जनतेला शिवीगाळ केलीत तर तुम्हाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. राज्यात केंद्राच्या विकास योजनांना जाणीवपूर्वक अडथळे आणण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com