
PM Modi Australia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे ऑस्ट्रेलियाच्या आहेत. आज मोदींनी ऑस्ट्रेलियात २० हजार अनिवासी भारतीयांना (NRI) संबोधित केले. दरम्यान या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) यांनी मोदींची जोरदार प्रशंसा केली.
अल्बानीज म्हणाले,"पंतप्रधान मोदी हे बॉस आहेत. मोदींचे स्वागत करणे हा आमच्यासाठी बहुमान आहे. पंतप्रधान म्हणून माझे पहिले वर्ष आहे, मी माझे मित्र मोदींना सहा वेळा भेटलो आहे, पण त्यांच्यासोबत एका मंचावर उभे राहणे, हे भाग्य आहे." (Latest Marathi News)
ते पुढे म्हणाले की, "पंतप्रधान मोदी हे बॉस आहेत. जेव्हा मी मार्चमध्ये भारतात होतो, तेव्हा गुजरातमध्ये होळी साजरी करणे, दिल्लीत महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण करणे ही अविस्मरणीय क्षणांनी भरलेली माझ्यासाठी एक सहल होती. मी जिथेही गेलो, तिथे मला ऑस्ट्रेलिया आणि भारतातील लोकांमध्ये घट्ट नाते असल्याचे जाणवले, तुम्हाला भारत समजून घ्यायचा असेल तर ट्रेन आणि बसने प्रवास करा."
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सिडनी शहरात समुदायाच्या कार्यक्रमात "लिटिल इंडिया" गेटवेची पायाभरणी केली. सिडनीच्या ऑलिम्पिक पार्क स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. पीएम मोदी स्टेडियममध्ये येताच उपस्थित लोकांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.