सोनिया गांधींना ईडीची नोटीस आल्याने राज्यातील काँग्रेस नेते संतापले...

Sonia Gandhi|ED|Nana Patole : भाजपाच्या दडपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही, असे नाना पटोले म्हणाले.
Sonia Gandhi News, Congress News, Latest Political News Updates
Sonia Gandhi News, Congress News, Latest Political News Updatessarkarnama

Nana Patole : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे (BJP) केंद्रातील सरकार मनमानी व हुकूमशाही पद्धतीने काम करत असून विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी ईडी, (ED) इन्कम टॅक्स, सीबीआयसारख्या (CBI) संस्थांचा गैरवापर करत आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना ईडीने पाठवलेली नोटीस ही राजकीय सूडभावनेने पाठवलेली आहे. भाजपाच्या, अशा दडपशाहीला काँग्रेस (Congress) पक्ष भीक घालत नाही. त्यांच्या अशा कारवायांना सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला. तर यामुळे जनतेच्या लढाईची धार तसूभरही कमी होणार नाही. हम डरेंगे नहीं, लढेंगे और जितेंगे!, अशा शब्दात कॅाग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भाजपवर टीका केली आहे.

Sonia Gandhi News, Congress News, Latest Political News Updates
शिवसेनेचे ११ खासदार अमित शहांना भेटले; ठाकरेंना कोंडीत पकडण्याची रणनीती तिथंच ठरली!

पटोले म्हणाले की, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीची नोटीस ही राजकीय द्वेषातून पाठवलेली आहे. या प्रकरणात एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नसून नॅशनल हेरॉल्डशी संबंधित कोणत्याही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत. हा सर्व व्यवहार पूर्ण पारदर्शक आहे. यात कसल्याही प्रकारच्या चल-अचल संपत्तीचे हस्तांतरण झालेले नाही व कोणालाही लाभ झालेला नसताना मनी लाँडरिंगचा गुन्हा कसा होतो? असा सवाल पटोलेंनी उपस्थित केला आहे.

२०१५ साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे केवळ गांधी कुटुंबाला नाहक त्रास देण्याचा प्रकार आहे. मोदी सरकार जाणीवपूर्वक काँग्रेस नेतृत्वाची छळवणूक करत आहे. सोनियाजी गांधी यांना २१ जुलैला हजर राहण्याचे पाठवलेले ईडीचे समन्स हे राजकीय सूडभावनेतूनच आहे. काँग्रेसला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र, अशा दबावाला अथवा दहशतीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. देशातील जनतेचे प्रश्न काँग्रेस यापुढेही हाती घेऊन मोदी सरकारला जाब विचारत राहिल, असा हल्लाबोल पटोले यांनी केला आहे.

Sonia Gandhi News, Congress News, Latest Political News Updates
शरद पवार आणि रावसाहेब दानवे दिल्लीत एक कार्यक्रम ठरविणार....

सोनिया गांधी यांच्या आधी राहुल गांधी यांनाही ईडीने पाच दिवस दररोज चौकशीच्या नावाखाली ईडी कार्यालयात १०-१० तास बसवून त्यांचा छळ केला. ईडीसारख्या सरकारी संस्था मोदी सरकारच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. काँग्रेस पक्ष कोणत्याही चौकशीला घाबरत नाही, त्याचा लोकशाहीमार्गाने व कायद्याच्या माध्यमातून उत्तर दिले जाईलच पण काँग्रेस नेतृत्वाला राजकीय सुडभावनेने नाहक त्रास दिला जात आहे हे खपवून घेतले जाणार नाही, तसेच अशा सूडभावनेच्या कारवाईचा काँग्रेस पक्ष निषेध करत असून वेळ पडली तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशाराही पटोलेंनी दिला आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून "केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून काँग्रेस नेत्यांना त्रास देण्याचा जो प्रयत्न सुरु आहे, त्यात भाजप यशस्वी होणार नाही. सोनिया गांधी यांना ईडी नोटीस पाठविल्याने त्या नेतृत्व करत असलेल्या जनतेच्या लढाईची धार तसूभरही कमी होणार नाही. हम डरेंगे नहीं, लढेंगे और जितेंगे!, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in