देशाचा जीडीपी घसरतोय अन् डीपी वाढतोय; नान पटोलेंचा मोदींना टोला...

OBC | OBC Reservation| ओबीसीचे मंत्रालय व्हावे, या मुद्यावर माझे पंतप्रधान मोदींसोबत भांडण झाले होते
Nana Patole
Nana Patole

नवी दिल्ली : मंडल आयोगामुळे आपल्याला आरक्षण मिळालेले आहे. २७ टक्के आरक्षण दिले गेले. पण आजही मंडल आयोगानंतर आपल्याला २७ टक्के आरक्षण (OBC reservation) मिळालेले नाही. शिक्षण, नोकऱ्यांमध्ये आपले आरक्षण संपत चालले आहे. भविष्यात आरक्षण हे एक स्वप्नंच, दिवास्वप्नचं राहणार का, असा सवाल कॉंग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. नवी दिल्लीत आयोजित ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

ससा झाडाखालून जालला होता. त्यावर झाडाचे पान पडले. त्याला वाटलं की, वादळ त्यांच्यावर येऊन पडले आणि तो पळत सुटतो. त्याला काटे टोचतात आणि तो रक्त बंबाळ होतो शेवटी मरतो. ओबीसी बांधवांसोबतही तसेच झाले. स्वातंत्र्याचे ७५ वर्ष साजरे करतानाही आपल्याला ओबीसींना हक्कांसाठी लढावे लागते आहे. त्या सश्यासारखी आपली स्थिती झाली आहे. मंडल आयोगामुळे आपल्याला आरक्षण मिळालेले आहे. २७ टक्के आरक्षण दिले गेले. पण आजही मंडल आयोगानंतर आपल्याला २७ टक्के आरक्षण मिळालेले नाही. हे फिरदौस मिर्झा यांनी सांगितले. सरकारकडून खासगीकरण केले जात आहे. शिक्षण, नोकऱ्यांमध्ये आपले आरक्षण संपत चालले आहे. भविष्यात आरक्षण हे एक स्वप्नंच, दिवास्वप्नचं राहणार का, असा सवाल पटोले यांनी केला.

Nana Patole
आजच्या देवेंद्र फडणवीसला ओबीसी बांधवांनीचं बनवलं आहे : उपमुख्यमंत्र्यांचे दिल्लीत विधान

ओबीसींची संख्या मंत्रीमंडळात जास्त आहे. पण जेथे कायदे बनतात, तेथे ओबीसींना स्थान नाहीये. आजही ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा फुटबाल केला जात आहे. आज आपण येथे आलो, ही केवळ हजेरी राहू नये, तर येथे खऱ्या अर्थाने मंथन झाले पाहीजे, आपल्याला काय मिळाले, याचा विचाल झाला पाहिजे. ओबीसीचे मंत्रालय व्हावे, या मुद्यावर माझे पंतप्रधान मोदींसोबत भांडण झाले होते, त्यानंतर मी खासदारकीचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ही लढाई सुरू आहे. केंद्रात जसे अल्पसंख्यांकाचे मंत्रालय बनले, तसेच ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय बनले पाहिजे. राज्यात झालेच आहे, आता केंद्रात व्हावे, अशी मागणी पटोले यांनी केली.

देशात आपली संख्या मोठी आहे. पंतप्रधान आपण ओबीसी बनवला, पण गेल्या ८ वर्षात ओबीसींना काय मिळाले, याचा विचार झाला पाहिजे. शेतकऱ्यांना काही मिळाले नाही. आता तर जीएसटीने कहर केला आहे. धान्य, दुध, दही, पनीर यांसारख्या दैनंदिन वस्तुंवरही जीएसटी वाढवण्यात आला आहे. पाकितल्या दुधाला जीएसटी आहे. जोक होत आहेत. देशभर आपला समाज शेतीशी जोडला आहे. त्यामुळे त्याचे मंथन येथे झाले पाहिजे. शेतीच्या बाबतीत चर्चा झाली नाही, तर ओबीसींवर अन्याय आपणच केला, असेच म्हणावे लागेल, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

आज आपण ओबीसी अडचणीत आहोत. जीडीपी वाढतो, तो शेतीच्या माध्यमातूनच वाढतो. जी काढून टाकला तर राहतो डीपी राहतो आणि आज सर्व देश जीडीपी सोडून डीपीच्या मागे लागला आहे. सध्या काय तर तिरंग्याचा डीपी चालत आहे. केंद्र सरकारही जीडीपी सोडून डीपीच्या मागे लागले आहे. आपण मागणारा समाज नाही, तर देणारा समाज आहो. पण आज आपल्याला मागणारा समाज बनवण्यात आले आहे. ओबीसी समाज पुन्हा देणारा बनला पाहिजे. मी विधानसभा अध्यक्ष असताना ओबीसींच्या जातीनिहाय जनगणना काढण्यासाठी अनेक मोर्चे काढण्यात आले. मी स्वतः विधानभेत ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव पारित केला.

Nana Patole
OBC महासंघाचे अधिवेशन; शरद पवार, देवेंद्र फडणवीस येणार एकाच मंंचावर

पण मग कोरोना मध्येच आला आणि जनगणना झाली नाही. नाही तर तेव्हाच ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली असती. त्यानंतर काय झाले, हे सर्वांना माहितच आहे. मी सुद्धा गेल्या ३० वर्षापासून राजकारणात आहे. माझाही अनुभव दांडगा आहे. त्यामुळे ३० वर्षाचे राजकारण आम्हाला कुणी सांगू नये, असा टोला पटोलेंनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. आता जनगणना होईल, तेव्हा आपल्याला अधिक जोर लावावा लागणार आहे. राजकारण, ईडीच्या कारवाया सुरूच राहणार आहेत. इंग्रजांचे अत्याचार वाढले तेव्हा त्यांना येथून जावे लागले. आज केंद्रातील सरकारचे अत्याचार वाढत आहे. जनसामान्याचा राग अनावर झाल्यावर यांनासुद्धा जावे लागणार आहे.

ओबीसींमुळे मी निवडून येत आलो आहे, असे फडणवीसांनी म्हटले. ते ओबीसी नाहीत, पण मी स्वतः ओबीसी आहे आणि आपली ताकत मोठी आहे. जे मी केले की, खासदारकी एका झटक्यात सोडून दिली आता पूर्ण ओबीसी समाजाला नाना पटोले बनावे लागणार आहे. ज्या समाजामुळे आपण निवडून येतो. आमदार, खासदार, मंत्री होतो. ते झाल्यावर आपण समाजाला काय देता येईल, यासाठी काम केले पाहिजे. आपल्या १० पिढ्यांचे भले करण्याचा विचार सोडून दिला पाहिजे, असे म्हणत नाना पटोले यांनी तमाम राजकीय पुढाऱ्यांनाही टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com