राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी नलिनी श्रीहरन म्हणते, आता...

Nalini Shriharan | दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडातील सर्व दोषींची तीन दशकांच्या कारावासानंतर शनिवारी (१२ नोव्हेंबर) तामिळनाडूतील तुरुंगातून सुटका करण्यात आली.
Nalini Shriharan
Nalini Shriharan

Nalini Shriharan तामिळनाडू : वेल्लोर सेंट्रल जेलमध्ये असताना 2008 मध्ये, प्रियंका गांधी यांनी भेट घेतली होती. त्यांनी वडील राजीव गांधी यांच्या हत्येबद्दल विचारले. त्यावेळी मला जे काही माहीत होते, ती सर्व माहिती मी प्रियांकाला दिली होती, यावेळी वडिलांच्या आठवणीने तिथेच प्रियंका गांधी यांना रडू कोसळले होते, अशी माहिती नलिनी श्रीहरन हिने दिली.

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडातील सर्व दोषींची तीन दशकांच्या कारावासानंतर शनिवारी (१२ नोव्हेंबर) तामिळनाडूतील तुरुंगातून सुटका करण्यात आली. व्ही. श्रीहरन उर्फ ​​मुरुगनची पत्नी नलिनी हिची पहिली सुटका झाली. यानंतर नलिनी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र व राज्य सरकारचे आभार व्यक्त केले.

Nalini Shriharan
Gujarat Elections 2022 : आपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा ; 'हे' असतील उमेदवार

वेल्लोर महिला विशेष कारागृहातून सुटका झाल्यानंतर, नलिनी वेल्लोर मध्यवर्ती कारागृहात होती. तर तिचा पती श्रीहरन उर्फ ​​मुरुगन (श्रीलंकेचा नागरिक)चीही सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर त्याला पाहून ती खूप भावूक झाली होती. एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना नलिनीने राज्य सरकार आणि केंद्र सरकारचेही आभार मानले. यावेळी बोलताना नलिनी म्हणाली की, मी गांधी कुटुंबातील कोणत्याही सदस्याला भेटण्याचा विचार करत नाहीये. पण आता मला माझ्या कुटुंबासोबत राहायचे आहे. माझे सर्व कुटुंबीय इतके दिवस वाट पाहत होते.

मुरगनसोबतच आणखी एक दोषी एस. राजा उर्फ ​​संथन याची वेल्लोर तुरुंगातून सुटका करण्यात आली. रॉबर्ट पेस आणि जयकुमार या दोन दोषींची येथील पुझल तुरुंगातून सुटका करण्यात आली. सहावा दोषी पी रविचंद्रन याचीही मदुराई तुरुंगातून सुटका झाली. आणखी एक दोषी ए.जी पेरारिवलनची मे महिन्यात सुटका झाली होती. तर नलिनी श्रीहरन हिच्यासोबतच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील चार दोषी रॉबर्ट पायस आणि जयकुमार यांची पुझल सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली. यासोबतच मुरुगन आणि त्याचा एक साथीदार संथन यांची वेल्लोर सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in