Nana Patole News : 'भावी मुख्यमंत्री' यादीत आणखी एका नावाची भर ; काँग्रेसच्या नेत्याचे बॅनर झळकले ; राजकीय चर्चांना उधाण

Nana Patole News : काँग्रेसच्या वतीने राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Nana Patole Latest News
Nana Patole Latest NewsSarkarnama

Nana Patole News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख असलेले बॅनर राज्यात पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर विविध ठिकाणी झळकले आहेत. यात आणखी नेत्यांची भर पडली आहे.

आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले (Nana Patole) यांच्या नावाची यात भर पडली आहे. सोमवारी (ता.५) नाना पटोले यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने काँग्रेसच्या वतीने राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Nana Patole Latest News
Odisha Triple Train Accident : रेल्वे अपघातानंतर वरुण गांधींनी खासदारांना केली ही विनंती

नागपूर येथील अजनी भागात नाना पटोले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर नाना पटोलेंचा उल्लेख 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. "शेतकरी पूत्र, कष्टकरांचे नेते नाना पटोले अशा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे.

आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे महविकास आघाडीमध्ये चर्चा बैठकांचे सत्र सुरू असताना काँगेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि ठाकरे गटाच्या (Thackeray Group) कार्यकर्त्यांकडून नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेले बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरले आहेत.

Nana Patole Latest News
BJP Leader Prasanta Basunia Shot Dead : घरात घुसून BJP नेत्यावर गोळी झाडली ; TMC वर संशयाची सुई ; भाजप नेते आक्रमक..

काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले होते, त्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे देखील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले होते.

Nana Patole Latest News
Sachin Pilot will launch own party : काँग्रेसमध्ये भूंकप होणार ; 'पायलट' घेणार नवी भरारी ; 'पीके' च्या मदतीने नवा पक्ष ...

या बॅनर्समुळे राजकीय गोटात विविध अंदाज वर्तवण्यास सुरुवात झाली आहे. नागपूरमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले होते. त्यानंतर आता नागपुरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे "भावी मुख्यमंत्री" बॅनर झळकले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले आहे.

भाजपकडून नेहमीच मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावालाच पसंती देण्यात आली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर देखील भाजप नेत्यांनी फडणवीसच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं म्हटले. तर शिंदेंना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com