राज्यसभेसाठी मी पात्र नाहीये का ? ; नगमांचा सोनियांना सवाल, धुसफुस चव्हाट्यावर

अनेकांचं राज्यसभेत जाण्याचं स्वप्न भंगलं, अनेकांचा पत्ता कट, पक्षांतर्गत धुसफुस चव्हाट्यावर
राज्यसभेसाठी मी पात्र नाहीये का ? ; नगमांचा सोनियांना सवाल, धुसफुस चव्हाट्यावर
Sonia Gandhi News, nagma News, Rajya Sabha elections 2022 latest newssarkarnama

नवी दिल्ली : येत्या १० जूनला राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha seat) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांची यादी जाहीर होत आहे. अनेक इच्छुकांचा यात पत्ता कट करण्यात आल्याने पक्षांतर्गत धुसफुस चव्हाट्यावर येत आहे. (Rajya Sabha elections 2022 latest news)

काही जण याबाबत मौन बाळगून आहेत, तर काहींनी थेट पक्षश्रेष्ठींवर उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. यादी जाहीर झाल्यानंतर नाराज काँग्रेस (congress) नेते सोशल मीडियातून नाराजी व्यक्त करीत आहेत. अनेकजणांनी राज्यसभेत जाण्यासाठी लॉबिंग केली होती, त्यांना पक्षातील वरिष्ठांनी शब्द दिला होता, पण पक्षश्रेष्ठींच्या निर्णयामुळे हे पक्षातील वरिष्ठ नेते तोंडघशी पडले आहेत.

काँग्रेसची बहुप्रतिक्षित उमेदवारांची यादी रविवारी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीबाबत अनेकांना उत्सुकता होती.ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेसमधील अनेकांचं राज्यसभेत जाण्याचं स्वप्न भंगलं.

काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच काँग्रेसमध्ये अनेक दिवसापासून चर्चा होती.अनेकांच्या नावांची चर्चा होती, पण काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अचानक काहींना उमेदवारी दिल्याने अनेकांचा पत्ता कट झाला. आधीच काँग्रेसचा जनाधार घटत आहे. त्यात इच्छुकांची नाराजी वाढली आहे.

 Sonia Gandhi News, nagma News, Rajya Sabha elections 2022 latest news
जग हादरलं : पुतीन यांचा मृत्यू ? ; तोतया सांभाळतोय रशियाचा कारभार

महिला काँग्रेसच्या महासचिव, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या अभिनेत्री नगमा (nagma) यांच्यासह काँग्रेसचे दुसरे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची थेट अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. नगमा यांची उमेदवारी कापण्यात आल्यानंतर त्यांनी याबाबतची आपली खदखद टि्वटमधून व्यक्त केली आहे.

'२००३-०४ मध्ये मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा काँग्रेस सत्तेत नव्हती. त्यावेळी काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधींनी मला वचन दिलं होतं की, राज्यसभेत पाठवणार. तेव्हापासून आतापर्यंत १८ वर्ष झाली आहेत. अजूनही ती वेळ आली नाहीये. इकडे इम्रान प्रतापगडी राज्यसभेत गेले आहेत. मी यासाठी पात्र नाहीये का?',असा सवाल नगमा यांनी उपस्थित केला आहे.

 Sonia Gandhi News, nagma News, Rajya Sabha elections 2022 latest news
नितीन गडकरींना दलालांची भीती ? जाहीर सभेत व्यक्त केली चिंता

"कदाचित माझ्या तपर्श्चयेतच काही उणीवा राहिल्या असाव्यात," अशा शब्दात पवन खेरा यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. नगमा यांनी थेट इम्रान प्रतापगडी यांचं नाव घेतच अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस राज्यसभेचे हे दहा उमेदवार

  • छत्तीसगढ : राजीव शुक्ला,रंजिता रंजन,

  • हरियाणा : अजय माकन,

  • कर्नाटक : जयराम रमेश,

  • मध्य प्रदेश : विवेक तन्खा

  • महाराष्ट्र : इम्रान प्रतापगडी

  • राजस्थान : रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी,

  • तामिळनाडू : पी. चिदंबरम

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in