आयएएस शिल्पा नाग यांचा छळ नाहीच; उपायुक्त रोहिणी सिंदुरी यांनी मांडले 5 मुद्दे

आयएएस अधिकारी व म्हैसूर महापालिकेच्या आयुक्त शिल्पा नाग यांनी आज राजीनामा तडकाफडकी दिला. यावरुन वाद निर्माण झाला आहे.
mysore district commissioner rohini sindhuri denies allegation of ias shilpa nag
mysore district commissioner rohini sindhuri denies allegation of ias shilpa nag

म्हैसूर : वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आयएएस अधिकारी (IAS) व म्हैसूर (Mysore) महापालिकेच्या आयुक्त शिल्पा नाग (Shilpa Nag) यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला. कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्याच्या उपायुक्त रोहिणी सिंदुरी (Rohini Sindhuri) या त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिल्पा नाग यांच्या राजीनाम्यामुळे मोठी खळबळ उडाली असून, यावर रोहिणी सिंदुरी यांनी त्यांची बाजू मांडली आहे. 

रोहिणी सिंदुरी यांनी त्यांच्या बचावासाठी मांडलेले पाच मुद्दे : 
1) मी शिल्पा नाग यांचा कोणताही छळ केलेला नाही आणि त्यांनी अशा एकाही घटनेचा उल्लेखही केलेला नाही. 
2) कोरोना संकटाच्या काळात माझ्यावर कोरोना महामारीच्या हाताळणीची जबाबदारी आहे. कोरोनाचे नियंत्रण करण्यावर माझा पूर्णपणे भर असून, माझ्यावरील जबाबदारी पूर्ण करण्याला माझे प्राधान्य आहे. 
3) शिल्पा नाग या मागील काही काळापासून कोरोना आढावा बैठकांना उपस्थित राहत नाहीत. म्हैसूर शहर महापालिका कोरोनाचे नवीन रुग्ण, मृत्यू आणि सक्रिय रुग्णसंख्या याबद्दल विरोधाभासी माहिती देत आहेत. यात सुधारणा करण्याचे आदेश मी दिले होते. कल्पनाविलास केला तरी यातील एकही बाब छळ होत नाही. 
4) जिल्ह्यातील खासगी उद्योग, कारखाने, आयटी कंपन्या यांच्याकडून सीएसआरसाठी येत असलेल्या निधीची जबाबदारी नाग यांच्यावर होती. परंतु, त्यांनी हा निधी केवळ म्हैसूर महापालिकेवरच खर्च केला. यामुळे मी संपूर्ण खर्चाचा तपशील त्यांच्याकडे मागितला होता. 
5) मागील दहा दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये शिल्पा नाग या जिल्हा प्रशासनाविरोधात बोलत आहेत. अशा प्रकारचे वर्तन म्हैसूर शहराच्या आयुक्तांना शोभनीय नाही. 

राजीनाम्या दिल्याची घोषणा नाग यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्या म्हणाल्या की, आज मी राजीनामा देत आहे. माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी येथे योग्य वातावरण नाही. कुणीही माझ्यासारखे अशा परिस्थितीतून जाऊ नये. जिल्हा उपायुक्त रोहिणी सिंदुरी यांनी माझा अपमान केला आहे. मी माझा राजीनामा मुख्य सचिवांकडे पाठवला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही सिंदुरी या लक्ष्य करीत आहेत. महापालिकेने अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. परंतु, याचे श्रेय जिल्हा प्रशासन घेत आहे. 

राज्याच्या मुख्य सचिवांच्या कार्यालयाने शिल्पा नाग यांचा राजीनामा मिळाला नसल्याचे म्हटले आहे. हा वाद मिटवण्यासाठी खुद्द मुख्य सचिव पी. रवि कुमार हे म्हैसूरला भेट देणार असल्याचे समजते. दरम्यान, म्हैसूरचे पालकमंत्री एस.टी.सोमशेखर यांनी नाग यांचा राजीनामा सरकार स्वीकारणार नाही, असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांशी या प्रकरणी चर्चा करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com