'महाविकास आघाडीचे सरकार पंचवीस वर्षे टिकणार'; सुप्रिया सुळेंनी विरोधकांना ठणकावले

लोकसभेत बोलताना सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना सुनावले आहे
'महाविकास आघाडीचे सरकार पंचवीस वर्षे टिकणार'; सुप्रिया सुळेंनी विरोधकांना ठणकावले

नवी दिल्ली : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन दोन वर्षे झाली. मात्र सरकार स्थापन झाल्यापासून भाजप मधील नेते सातत्याने महाविकास आघाडीचे ((Mahavikas Aghadi) सरकार पडणार असल्याचे वक्तव्ये करत आहेत. सरकार पडण्याचा सातत्याने दावा करणाऱ्या या सर्वांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेत बोलताना ठणकावले आहे.

सरकार पडण्याची काळजी करुच नका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उत्तम प्रकारे चालत आहे, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करू पाहणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला सुनावले. तसेच, महाविकास आघाडी सरकार आणखी पंचवीस वर्षे टिकणारच. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

'महाविकास आघाडीचे सरकार पंचवीस वर्षे टिकणार'; सुप्रिया सुळेंनी विरोधकांना ठणकावले
मुका बाप कॅन्‍सरग्रस्‍त मुलासाठी अधिकाऱ्यासमोर हात जोडतो तेव्हा...

दरम्यान, सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी, 'आम्ही भाजपमध्ये आहोत त्यामुळे ईडी आमच्याकडे फिरकणारही नाही,' असे वक्तव्य केले होते. यालाही सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. 'म्हणजेच तुम्ही भाजपमध्ये असाल किंवा भाजपसोबत असाल तर तुम्ही सुरक्षित आहात असा याचा अर्थ होतो. एका केंद्रीय मंत्र्याने तर आमच्याकडे दोषमुक्त करण्याची जादूची पावडर आहे, असे म्हटले होते.याचाच अर्थ सत्तेच्या जोरावर तुमच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मात्र तुम्ही कितीही प्रयत्न करा. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर तुमच्या या प्रयत्नांचा कोणताही परिणाम होणार नाही आणि महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार पाच नाही तर पंचवीस वर्षे पूर्ण करेल, असा विश्वासही खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

''महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी ठरवून गोष्टी केल्या जात आहेत. अनिल देशमुख यांच्या संपत्तीवर एका वर्षात सात वेळा ईडीने धाडी टाकल्या. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंसह राज्यातील अनेक नेत्यांवर आणि मंत्र्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावत त्यांना त्रास दिला जात आहे. केवळ नेतेच नाहीत तर त्यांच्या कुटुंबीयांनाही लक्ष्य केले जात आहे. मात्र तरीही या चौकशांमधून काहीच निष्पन्न होत नाही, असा टोलाही खासदार सुळे यांनी लगावला.

तर, '' तपास यंत्रणांच्या माध्यमातून आपण महाविकास आघाडी सरकार अस्थिर करु, असे स्वप्नही केंद्रातील सत्ताधाऱयांनी पाहू नये, असा खरमरीत टोला शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी लगावला. बिहार निवडणूकांवेळी दिवंगत अभिनेता सुशांतसिंहचे प्रकरण बाहेर काढून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. आता आर्यन खान प्रकरणावरुन राज्याला बदनाम करण्याता प्रयत्न सुरु आहे. राज्यातील मंत्र्यांना त्रास देण्यासाठी त्यांच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी पडत आहेत, मात्र महाराष्ट्रातील सरकार याला भीक घालत नाही, अशा शब्दांत राऊत यांनी विरोधकांना ठणकावले. तसेच, ड्रग्जच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे. मात्र तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे सरकार काही पडणार नाहीच, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in