देशभरातील हिंसाचाराच्या घटना थांबवण्यासाठी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai Police | Delhi Riots 2022 | Madhya-Pradesh : अमरावती आणि मुंबईमध्ये तणावपूर्ण शांतता
Mumbai Police News Updates
Mumbai Police News UpdatesSarkarnama

मुंबई : देशात मागील काही काळात हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकतेच राजधानी दिल्लीत (Delhi) हनुमान जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीवर काही समाज कंटकांनी हल्ला केला. त्यापूर्वी मध्य प्रदेशमध्येही (Madhya Pradesh) रामनवमीच्या दिवशी हिंसाचार झाला होता. याशिवाय महाराष्ट्रातही (Maharashtra) ही भोंग्यांच्या प्रकरणावरुन वातावरण तंग झाले असून अमरावती आणि मुंबईमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. (Mumbai Police News Updates)

या सर्व हिंसाचाराच्या घटना थांबवण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने अवघ्या काही दिवसात १२ हजार ८००  वादग्रस्त पोस्ट सोशल मिडियावरून हटवल्या आहेत. विशेष शाखेने यावर्षी जानेवारी महिन्यात पाच हजार ७५४, फेब्रुवारी महिन्यात ४ हजार २५२, मार्चमध्ये ३ हजार ९५८ प्रक्षोभक पोस्ट हटवल्या आहेत.

Mumbai Police News Updates
सदावर्तेंचा पुढचा मुक्काम विदर्भात; साताऱ्यानंतर अकोला पोलिसांना मिळाली परवानगी

या सोबतच या प्रकरणी मुंबईत मानखुर्द, मालवणी, कुरार,आरे अशा विविध पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. शिवाय पोलिसांनी आतापर्यंत ६१ जणांना अटक केली आहे. या धार्मिक हिसांचारांना अनेकदा सोशल मिडियावरील वायरल पोस्टममुळे वेगळे वळण मिळते. त्यामुळे विशेष शाखा व सायबर पोलिस अशा सोशल मिडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर नजर ठेवून राहतात, आणि गरज पडल्यास त्या हटवतात, असे पोलिसांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com