बॉलिवूड स्टार्सचा होळी दिवशी बेरंग; मुंबईत कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त

Bollywood | Mumbai | Drugs | Police : मुंबईत पोलिसांची धडक कारवाई
Drugs
Drugs Sarkarnama

मुंबई : देशभरात होळीच्या सणाचा उत्साह असताना मुंबईत पोलिसांनी (Mumbai Police) मोठी कारवाई केली आहे. यामुळे बॉलिवूड स्टार्सचा होळी दिवशी रंगाचा बेरंग झाल्याची चर्चा आहे. मुंबईत पोलिसांनी बिहारमधून ड्रग्ज तस्करीसाठी (Drugs Peddler) आलेल्या दोघांना अटक केली आहे. दिंडोशी पोलिसांनी संतोष नगर परिसरातून या दोघांना ताब्यात घेतले आहे. याशिवाय त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ३० लाखांचे चरस ड्रग्ज (Charas Drugs) जप्त केले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिंडोशी येथील संतोषनगर परिसरातील शिवशाही प्रकल्पात काही लोक चरस विकण्यासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिथल्या दोघांची चौकशी केली असता त्यांच्याकडून ३ किलोपेक्षा जास्त चरस आढळून आले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी ३० लाख इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असून गौरवकुमार प्रसाद (१९) आणि कृष्णकुमार पंडित (२६) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान पोलिस आता ज्यांना चरस पुरवठा केला जाणार होता अशा लोकांचा शोध घेत आहेत. होळीच्या सणासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांचे आयोजन केले जात असते. यात मुंबईत फिल्म स्टार्सच्या पार्ट्यांची संख्या जास्त असते. या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी होणार असल्याचा पोलिसांना संशय होता. त्या आधारे कारवाई करत पोलिसांनी आरोपींकडून ३ किलोहून अधिक चरस अमली पदार्थ जप्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in