मुंबई पोलिसांकडून ईडीच्या चौकशीत अडथळे; विकाससिंह यांचा खळबळजनक आरोप

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरून उठलेला गदारोळ कायम आहे. मुंबई पोलिसांच्या तपासावर अनेक जण प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असताना विकास सिंह यांनी मुंबई पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
mumbai police is obstructing ed probe in sushant singh rajput case says vikas singh
mumbai police is obstructing ed probe in sushant singh rajput case says vikas singh

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी मुंबई पोलिसांना लक्ष्य केले असतानाच सुशांतच्या वडिलांचे वकील विकाससिंह यांनी आता मुंबई पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.   

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

विकाससिंह यांनी आता पुन्हा मुंबई पोलिसांना लक्ष्य केले आहे. मुंबई पोलीस हे अतिशय प्रोफेशनल आहेत, असे कौतुक करुन त्यांनी म्हटले आहे की, काही कारणामुळे मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणात दिशा भरकटले. यामुळे सुशांतच्या वडिलांना बिहार पोलिसांकडे धाव घ्यावी लागली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सर्वांचे मोठे-मोठे युक्तिवाद ऐकून घेतले आहेत. आता न्यायालयाने या प्रकरणी सीबीआयला तपासात मदत करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना द्यावेत. 

मुंबई पोलीस हे ईडीच्या चौकशीत अडथळे आणत आहेत, असा आरोपही विकाससिंह यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ईडीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या चौकशीत मुंबई पोलीस अडथळे आणत आहेत. सुशांतचे मोबाईल ईडीला देण्यास मुंबई पोलिसांनी नकार दिला. मुंबई पोलीस का सहकार्य करीत नाहीत. ते असा खेळ का खेळत आहेत? तपासाचे तपशील इतर यंत्रणांशी मुंबई पोलिसांशी शेअर केलेले नाहीत. मुंबई पोलिसांची या प्रकरणातील भूमिका निष्पक्षपाती नाही. मुंबई पोलिसांनी तपासच केलेला नसल्याने त्यांनी एफआयआर दाखल केलेला नाही. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत.या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com