नुपूर शर्मांना अटक करण्यासाठी मुंबई पोलीस चार दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
Nupur Sharma Latest Marathi News
Nupur Sharma Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद पैगंबर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपने (BJP) निलंबित केलेल्या नेत्या नुपूर शर्मा यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. जागतिक पातळीवर हा मुद्दा गाजत असतानाच आता मुंबई पोलीस सक्रीय झाले आहेत शर्मा यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी त्यांना अटक करण्यासाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) चार दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. (Nupur Sharma Latest Marathi News)

एका वृत्तवाहिनीवर बोलताना नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देशासह जगभरातून त्याचा निषेध सुरू झाला. अनेक मुस्लिम बहुल देशांसह अमेरिकेनंही शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर भाजपनेही त्यांना प्रवक्ते पदावरून सहा वर्षांपासून निलंबित केले आहे. शर्मा यांच्यावर कारवाईसाठी देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली.

Nupur Sharma Latest Marathi News
Presidential Election : भाजपनं भारती पवार अन् विनोद तावडेंना लावलं कामाला

मुंबईत शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शर्मा यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई पोलीस मागील चार दिवसांपासून तळ ठोकून आहेत. पण त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही, असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शर्मा यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडे पुरेसे पुरावे असल्याची माहिती गृह विभागातील सुत्रांनी दिल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. मुंबईसह शर्मा यांच्याविरोधात ठाणे व देशभरात काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

दरम्यान, नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यासह कुटुंबियांनाही धमक्या येत आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांकडून त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. पण त्यानंतरही मुंबई पोलिसांना नुपूर शर्मा यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com