लॉकडाउनच्या झळा : कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नसल्याने पंचतारांकित हॉटेल बंद

लॉकडाउनमुळे हॉटेल उद्योगासमोर आता अस्तित्वाची लढाई आहे. खर्च परवडत नसल्याने अनेक पंचतारांकित हॉटेल आता बंद पडू लागली आहेत.
mumbai five star hotel hyatt regency shuts down until further notice
mumbai five star hotel hyatt regency shuts down until further notice

मुंबई : राज्य दोन महिन्यांनंतर अनलॉक (Unlock) झाले असून, हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. असे असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील हयात रिजन्सी (Hayat Regency) हे पंचतारांकित हॉटेल (Hotel) बंद करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी कंपनीकडे पैसे नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे (Lockdown) हॉटेल उद्योगासमोर आता अस्तित्वाची लढाई आहे. 

हॉटेल व्यवस्थापनाने याबाबत कर्मचाऱ्यांना पत्र लिहून कळवले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी कंपनीकडे पैसे नाहीत त्यामुळे नाइलाजाने हॉटेल सेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पंचतारांकित हॉटेलला सेवा देणे झेपत नसल्याचे समोर आले आहे.  यामुळे लॉकडाउनमुळे देशात सर्वांत जास्त रोजगार निर्माण करणारे हॉटेल आणि आदरातिथ्य क्षेत्र अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले आहे. ही केवळ सुरुवात असून येणाऱ्या काळात अनेक हॉटेल बंद पडतील, असा इशारा या क्षेत्रातील जाणकार देत आहेत.

हयात रिजन्सीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हॉटेलचे मुख्य व्यवस्थापक हरदीप मारवा यांनी ई-मेल लिहून हॉटेल सुरु ठेवण्यासाठी पैसे नसल्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय कळवला. या हॉटेलची मालकी एशियन हॉटेल (पश्चिम) या कंपनीकडे आहे.याबाबत बोलताना इंडिया हयातचे उपाध्यक्ष सुजय शर्मा म्हणाले की, कंपनी अडचणीत असून सेवा सुरू ठेवणे कठीण आहे. यामुळे पुढील सूचनेपर्यंत हॉटेल बंद असणार आहे. सध्या हॉटेलमध्ये थांबलेल्या पाहुण्यांची व्यवस्था कशी करता येईल याबद्दल बोलणी सुरू आहेत.

हयात हॉटेलची मध्यवर्ती बुकिंग सेवा काही काळासाठी स्थगित ठेवली जाणार आहे. दिल्लीच्या जे डब्ल्यू मॅरियेट्स या हॉटेलची मालकीही एशियन हॉटेल्सच्या उपकंपनीकडे आहे. या कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकाने फेब्रुवारीतच राजीनामा दिला होता. मुंबईतील हयात रिजन्सीची मालकी असलेली एशियन हॉटेल्स (वेस्ट) कंपनी डबघाईला आली. कंपनीला २०१९-२० मध्ये २१८ कोटी रुपयांचा तोटा झाला होता तर कंपनीचे उत्पन्न १४३ कोटी रुपये होते. कंपनीचा फायदा दोन वर्षांत १६ कोटींवरून अडीच कोटी रुपयांवर आला आहे.

गेल्या वर्षापासून लॉकडाऊनमुळे हॉटेलचा व्यवसाय ठप्प आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासही बंद झाला आहे. देशांतर्गत पर्यटन बंद असून, कॉर्पोरेट बैठकाही बंद झाल्या आहेत. हा कोरोनाचा धक्का आहे, हे निश्चित. हॉटेल जेवढे मोठे तेवढा पसारा मोठा आणि खर्चही जास्त असतो. गेल्या मार्चपासून हॉटेलमालकांना नुकसान सोसावे लागत आहे. केंद्र आणि राज्यांनी हॉटेल क्षेत्राला मदत केीली नाही, त्यामुळे हे क्षेत्र संकटात आले आहे, अशी माहिती हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न इंडियाचे प्रवक्ते प्रदीप शेट्टी यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com