'यूपी'त राजकीय भूकंप! मुलायमसिंहांच्या घरात फूट; सूनबाईंचा भाजपमध्ये प्रवेश

उत्तर प्रदेशातील राजकारणाने (UP Election 2022) वेग पकडला असून आज मोठ्या घडामोडी घडल्या.
Aparna Yadav jons BJP
Aparna Yadav jons BJPSarkarnama

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) तोंडावर उत्तर प्रदेशातील राजकारणाने वेग पकडला असून आज मोठ्या घडामोडी घडल्या. भाजपमध्ये फाटाफूट करणाऱ्या अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना त्यांच्या घरातूनच धक्का बसला आहे. त्यानुसार माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या सूनबाई अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे राज्यात राजकीय भूकंप घडला आहे.

मुलायमसिंह यांच्याऐवजी आता त्यांचे पुत्र व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाची (Samajwadi Party) धुरा सांभाळत आहेत. मुलायमसिंह यांचे दुसरे पुत्र प्रतिक यांच्या अपर्णा या पत्नी आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते. तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, त्यानंतर परत मुलायमसिंह आणि अखिलेश यांची स्तुती करून अपर्णा यांनी कुटुंबासोबतच असल्याचे दाखवले होते.

Aparna Yadav jons BJP
बार्शीचा हर्षद मेहता अशी ओळख असलेल्या विशाल फटेला व्हायचं होतं पाब्लो एस्कोबार!

आज अपर्णा यांनी सगळ्यांनाच धक्का देत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेवसिंह यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. मागील काही दिवसांत समाजवादी पक्षाने भाजपचे तीन मंत्री आणि आठ आमदार फोडल्याने प्रत्युत्तर देण्याची भाजपने तयारी चालवली होती. आता अखिलेश यांच्या भावाच्या पत्नीला फोडून भाजपने मोठा धक्का दिला आहे. अपर्णा यांनी लखनौ कॅन्टोन्मेंटमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. (Aparna Yadav joins BJP)

Aparna Yadav jons BJP
मोठी बातमी : करोडोंचा चुना लावणाऱ्या विशाल फटेला न्यायालयाचा दणका

गोरखपूरमधील भाजप आमदाराला खुली ऑफर

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अयोध्या आणि मथुरा या विधानसभा मतदारसंघांकडे पाठ फिरवली आहे. त्यांनी सुरक्षित अशा गोरखपूर (शहर) मतदारसंघातून विधानसभा निवडणूक (Assembly elections) लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी योगींवर डाव टाकला आहे. त्यांनी गोरखपूरमधील विद्यमान आमदारालाच खुली ऑफj दिली आहे. योगींनी गोरखपूरमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने तेथील विद्यमान भाजप आमदार राधामोहन अगरवाल यांचा पत्ता कट झाल्याचे मानले जात आहे. यामुळे अखिलेश यादवांनी अगरवाल यांना खुली ऑफर दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com