Attorney General |मुकूल रोहतगींनी धुडकावली केंद्र सरकारची अॅटर्नी जनरलपदाची ऑफर...

Mukul Rohtagi| विद्यमान अॅटर्नी जनरल के.के वेणुगोपाल यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपत आहे.
Attorney General |Mukul Rohtagi|
Attorney General |Mukul Rohtagi|

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी (Mukul Rohtagi) यांनी अॅटर्नी जनरल पदाची ऑफर फेटाळली आहे. त्यांच्या या निर्णयामागे कोणतेही विशिष्ट कारण त्यांनी सांगितले नाही. मात्र ही ऑफर दिल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभारही मानले आहे.

विद्यमान अॅटर्नी जनरल के.के वेणुगोपाल यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. वेणुगोपाल यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपणार होता. मात्र, केंद्र सरकारने ही मुदत तीन महिन्यांनी वाढवली. वेणुगोपाल यांना मोदी सरकारने तिसऱ्यांदा सेवेत मुदतवाढ दिली आहे. तर केंद्र सरकारकडून आता नवीन अॅटर्नी जनरलच्या शोधात आहे.

Attorney General |Mukul Rohtagi|
Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मी कुत्रा निशाणीवरही निवडून येतो...

के.के वेणुगोपाल यांच्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला केंद्राने रोहतगी यांना ए.जी पदाची ऑफर दिली होती. रोहतगी हे जून 2014 ते जून 2017 पर्यंत एजी होते. त्यांच्यानंतर वेणुगोपाल यांनी जुलै 2017 मध्ये या पदावर नियुक्ती केली होती. वेणुगोपाल यांची 29 जून रोजी तीन महिन्यांसाठी देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली होती.

"वैयक्तिक कारणांमुळे" तेही या पदावर कायम राहण्यास तयार नव्हते. पण तरीही त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत पदावर कायम राहण्याच्या सरकारच्या विनंतीला मान्यता दिली, असे केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

वेणुगोपाल यांचा ए.जी म्हणून पहिला कार्यकाळ 2020 मध्ये संपणार होता, तेव्हाही त्यांनी सरकारला त्यांच्या वयामुळे त्यांना त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. पण त्यावेळीही त्यांनी एक वर्षांचा कार्यकाळ स्वीकारला. त्यांचा दांडगा अनुभव पाहता केंद्र सरकारही त्यांना कायम ठेवण्यासाठी उत्सुक होते.

Attorney General |Mukul Rohtagi|
Shivsena: आगामी काळ फक्त ठाकरेंचा...इतरांची धुळधाण!

काय करतात अॅटर्नी जनरल

अॅटर्नी जनरल (देशाचा ऍटर्नी जनरल) हा देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी आणि केंद्र सरकारचा मुख्य कायदेशीर सल्लागार असतो. ते सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करतात. न्यायालये अनेकदा किचकट मुद्द्यांवर अॅटर्नी जनरलचे मत जाणून घेतात. अनेकदा राष्ट्रपतीही कोणत्याही कायदेशीर किंवा घटनात्मक मुद्द्यावर अॅटर्नी जनरलचा सल्ला घेतात. गेल्या वर्षी जूनमध्येही, वेणुगोपाल यांनी त्यांचे वय आणि आरोग्याशी संबंधित कारणे सांगून सरकारला आणखी मुदतवाढ न देण्याची विनंती केली होती. मात्र वेणुगोपाल हेच पदावर कायम राहावे, असा सरकारचा आग्रह होता. त्यासाठी स्वत: गृहमंत्रीही त्यांच्या घरी गेले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com