आर्यन खानला जामीन मिळवून देणारे रोहतगीही राणेंच्या प्रकरणात ठरले अपयशी

भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे.
Nitesh Rane and Mukul Rohatgi
Nitesh Rane and Mukul RohatgiSarkarnama

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. उच्च न्यायालयानंतर (High Court) आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राणेंना धक्का दिला आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आर्यना खानला जामीन मिळवून देणारे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) राणेंच्या बाबतीत अपयशी ठरले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. रोहतगी यांनी आज राणेंची बाजू मांडली. तर सरकारच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. जिल्हा बँकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे खोटे प्रकरण बनवण्यात आले. तक्रारदार हा विरोधी पक्षाचा आहे. नितेश राणे हे विद्यमान आमदार आहेत. पेपर कटरने भोसकल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे, असा युक्तिवाद रोहतगींनी केला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

रोहतगी यांनी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) बाजू मांडली होती. अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (NCB) आर्यनला गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला पकडले होते. त्यानंतर तो 8 ऑक्टोबरपासून आर्थर रोड कारागृहात होता. आर्यनसह तिघांच्या जामिनावर तीन दिवस उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. आर्यनच्या वतीने रोहतगी यांनी बाजू मांडली होती. रोहतगी हे आर्यनची बाजू मांडणार असल्याचे सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर तीन दिवसांच्या सुनावणीनंतर आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे. अखेर 30 ऑक्टोबरला आर्यनची कारागृहातून सुटका झाली होती. (Mukul Rohatgi appeared for Nitesh Rane)

Nitesh Rane and Mukul Rohatgi
पद्मभूषण जाहीर होऊनही 'मायक्रोसॉफ्ट'च्या सत्या नाडेलांचं मौन!

राणे यांनी आता उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. राणेंना राजकीय हेतूने अडकवण्यात आले आहे. त्यांना उच्च न्यायालयाने दिलेले संरक्षण दोनच दिवस बाकी राहिले आहे. त्यामुळे यावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. यावर आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांचा कालावधी दिली आहे. (Supreme Court rejects Nitesh Rane bail plea)

Nitesh Rane and Mukul Rohatgi
मोठी बातमी : नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते आता प्रकटले असून, सलग तीन दिवस ते कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत आहेत. या वेळी काल (ता.26) एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले होते की, कणकवली पोलिसांनी चौकशीसाठी मला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यामुळे मी सलग तीन दिवस चौकशीसाठी हजर झालो. उद्याही मी चौकशीसाठी येणार आहे. पोलिसांच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करेन, असा शब्द मी आधीच दिला होता. त्यानुसार मी कणकवली पोलीस ठाण्यात हजर झालो. यापुढेही पोलिसांना माझी गरज लागेल, तेव्हा मी हजर होईन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com