नक्क्वींना लोकसभा की उपराष्ट्रपतीपद? भाजपच्या मुस्लिम चेहऱ्यासाठी चाणाक्यांच्या मनात काय?

BJP | Mukhtar Abbas Naqvi | : नक्वींना विश्रांती की प्रमोशन?
Mukhtar Abbas Naqvi
Mukhtar Abbas NaqviSarkarnama

(Mukhtar Abbas Naqvi latest news)

नवी दिल्ली : भाजपमधील (BJP) प्रमुख मुस्लिम चेहरा असेलेल्या केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar abbas naqvi) यांना पुन्हा राज्यसभेत संधी न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आता पुढील ६ महिन्यात त्यांना संसदेच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व मिळवता आले नाही तर त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदावर गंडातर येणार हे निश्चित आहे. त्यामुळे भाजप नेतृत्वाकडून नक्वींना डावलण्यात आले आहे का? असा प्रश्न विचारले जावू लागला आहे?

मात्र भाजप नेतृत्वाच्या आणि भाजप चाणक्यांच्या मनात काही वेगळे आडाखे असल्याची खात्रीपूर्वक माहिती आहे. नक्वी यांना आगामी आझमगड किंवा रामगड पोटनिवडणुकीत तिकीट देऊन लोकसभेत आणले जाणार अशी चर्चा आहे. त्याच वेळी त्यांना ‘राज्यसभेचे नवे कारभारी‘ बनविण्यात येऊ शकते का? याबाबतही चाचपणी सुरु असल्याची माहिती आहे.

Mukhtar Abbas Naqvi
BMC साठी आरक्षण सोडत जाहीर : शिवसेनेच्या दिग्गजांना धक्का; मनसेच्या नेत्यांना दिलासा

विद्यमान उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांचा कार्यकाळ पुढील काही दिवसांमध्ये संपत आहे. पण आपल्याला दुसरा कार्यकाळ मिळावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. तथापि त्यांची प्रकृती व वय पाहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी-गृहमंत्री अमित शहा त्यांना दुसरा कार्यकाळ देण्याच्या मनस्थितीत नाहीत असे सांगितले जाते.

भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ही जबाबदारी गेल्या ८ वर्षांत फार महत्वाची बनली आहे. कारण मोदी सरकारने जंगजंग पछाडले तरी वरिष्ठ सभागृहात सरकारचे अजूनही स्पष्ट बहुमत नाही. नक्वी यांनी अलीकडच्या काळात संसदीय मंत्री म्हणून राज्यसभेत विरोधी पक्षीयांशी संवाद साधण्याबाबत तेथील सभागृह नेत्यांपेक्षा मोठी भूमिका बजावली आहे.

Mukhtar Abbas Naqvi
प्रतापगडींच्या उमेदवारीनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पहिला राजीनामा; सोनिया गांधीवरही टीका

नक्वी यांच्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ते अद्याप भाजपमधील ‘क्लब ७०‘ चे सदस्य नसल्याने काही अंशी वयही त्यांच्या बाजूने आहे. सोबतच त्यांची जागा घेणारा एकही मोठा मुस्लिम चेहरा सध्या दृष्टीपथात नसल्याने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून एका फटक्यात वगळणे भाजपसाठी सोपे नाही. शिवाय सध्याच्या टीम मोदीतील अटलबिहारी वाजपेयी युगापासूनचा ‘एकमेव' चेहरा आहेत.

या सर्व गोष्टींमुळे सूत्रांच्या माहितीनुसार अखिलेश यादव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या आझमगडमधून किंवा स्वतः नक्वी यांच्याच रामपूरमधून लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप नक्वी यांना उतरविण्याच्या तयारीत आहे. त्यांना लोकसभेचे तिकीट मिळाल्यास योगी आदित्यनाथ यांचे सरकार त्यांच्या पाठीशी आहे व स्वतः मोदीही त्यांच्यासाठी सभा घेतील. रामपूरमध्ये नक्वींच्या रूपाने मुस्लिम चेहरा देऊन भाजप एक डाव खेळू शकतो. रामपूरचा डाव फसला तर नक्वी यांना राष्ट्रपतीनियुक्त म्हणून राज्यसभेवर आणले जाऊ शकते. पक्षसंघटनेत २०२४ च्या आखणीतही त्यांना सामावून घेतले जाऊ शकते. मात्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com