संसदेच्या दरवाजाला लाथ मारून काच फोडणाऱ्या खासदार अडचणीत

राज्यसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर बुधवारी सभागृहाच्या दरवाजावर घोष यांनी संतापाने लाथ मारली होती.
MPs in trouble for kicking the door of Parliament and breaking glass
MPs in trouble for kicking the door of Parliament and breaking glass

नवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणावरून विरोधक आक्रमक असून संसदेत दररोज त्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरले जात आहे. त्यातही तृणमूल काँग्रेसचे खासदार अधिक त्वेषाने सरकारविरोधात आवाज उठवत आहेत. राज्यसभेतील तृणमूलच्या निलंबित सदस्यांपैकी अर्पिता घोष यांनी बुधवारी (ता. 5) दुपारी कामकाज तहकूब झाल्यानंतर सभागृहात प्रवेश करताना संतापाने दरावाजावर लाथ मारली. त्यामुळे दरवाजाची काच फुटून महिला सुरक्षारक्षकाला दुखापत झाली आहे. हे प्रकरण चांगलंच तापण्याची शक्यता असून घोष यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुरू झाली आहे. (MPs in trouble for kicking the door of Parliament and breaking glass)

राज्यसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर बुधवारी सभागृहाच्या दरवाजावर घोष यांनी संतापाने लाथ मारली होती. त्यामुळे दरवाजाची काच निखळून एक महिला सुरक्षा रक्षक जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संबंधित महिला सुरक्षारक्षकाने स्वतः लोकसभाध्यक्षांकडे लेखी तक्रार केली आहे. यात त्यांनी घोष यांच्या नावाचा स्पष्ट केला असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

या घटनेचे तीव्र पडसाद दोन्ही सचिवालयांत उमटले आहेत. सचिवालयाकडून कारवाईच्या मागणीवर जोर देण्यात आला आहे. संबंधित सुरक्षारक्षक या लोकसभेतील आहेत. राज्यसभा सचिवालयाने कालचे वातावरण पाहून लोकसभेकडे अतिरिक्त सुरक्षारक्षक देण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांची नियुक्ती राज्यसभा परिसरात करण्यात आली होती. त्यांच्या गळ्यावर दरवाजाच्या धारदार काचेमुळे जखम झाली आहे. . 

दरम्यान, घोष यांच्यासह डोला सेन व तृणमूलच्या काही खासदारांचे सभागृहातील वर्तन आक्षेपार्ह असल्याने त्यांना उर्वरित संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करावे, असा मतप्रवाह भाजप सदस्यांमध्ये आहे. मात्र सरकारला राहिलेल्या जेमतेम आठवडाभरात महत्वाची विधेयके राज्यसभेतील गोंधळात मंजूर करायची आहेत. त्यामुळे घोष यांच्यावर राज्यसभा अध्यक्षांनी कठोर बडगा उगारला तर त्यानंतरचे उर्वरित कामकाज चालणे अशक्य होण्याची भीती सरकारला आहे. 

वरिष्ठ सभागृहात मोदी सरकारकडे अजूनही बहुमत नसल्याने या गोंधळातच रोज किमान 3 विधेयके धडाधड मंजूर करण्याची रणनीती सरकारने आखली आहे. तर विरोधकांनी चर्चेसाठी नावे देऊन त्या माध्यमातून पेगॅसस प्रकरणाचा उल्लेख करण्याचे धोरण आखले आहे. त्यात मनोज झा, एल्लमारम करीम, दीपेंद्र हुडा, सुशील गुप्ता यांच्यासह वंदना चव्हाण व फौजिया खान यांना यशही मिळत आहे. मात्र, पेगॅसस शब्द आला तरी सदस्यांचा माईकच बंद केला जातो. संसदेत खासदारांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार लोकशाहीविरोधी असल्याची टीका चव्हाण यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com