शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्या वरूण गांधींना भाजपनं दिला डच्चू!

खासदार मनेका गांधी यांनाही कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही.
Varun Gandhi
Varun Gandhi

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेचे व्हिडीओ ट्विटवर शेअर करत भाजपचे खासदार वरूण गांधींनी कारवाईची मागणी केली आहे. या घटनेत केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाचा सहभाग असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. वरूण गांधींच्या ट्विटनंतर काही तासांतच त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आलं आहे.

भाजपने गुरूवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीमधून वरूण गांधींना वगळण्यात आलं आहे. तसेच खासदार मनेका गांधी यांनाही कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही. तर काही महिन्यांपूर्वी पक्षात दाखल झालेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व मिथुन चक्रवर्ती यांना कार्यकारिणीत घेण्यात आलं आहे. वरूण यांच्याप्रमाणेच शेतकरी आंदोलनावरून सरकार टीका करणारे माजी केंद्रीय मंत्री चौधरी विरेंदर सिंग यांनाही वगळलं आहे.

Varun Gandhi
भाजपकडून कंगनाचा पत्ता कट; लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा

वरूण गांधी यांनी लखीमपूर खीरी येथील घटनेनंतर सातत्याने दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी घटनेचे दोन व्हिडीओ ट्विटवर शेअर केले आहेत. गुरूवारी सकाळीही एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी अजय मिश्रा यांना अडचणीत आणले आहे. आपल्या ट्वीटर वरुण गांधी यांनी घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

लखीमपूर खिरीमध्ये जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना चिरडण्याचा हा व्हिडिओ कोणालाही हादरवून टाकेल. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घ्यावी आणि या वाहनांचे मालक, त्यांमध्ये बसलेले लोक आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी गांधी यांनी केली आहे. या ट्विटनंतर काही तासांतच भाजपनं कार्यकारिणीची घोषणा केली. त्यामध्ये वरूण गांधी यांना वगळण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

Varun Gandhi
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला अटक होणार; सर्वोच्च न्यायालयानं मागवली घटनेची माहिती

दरम्यान, राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह 80 नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय 50 विशेष निमंत्रित व 179 स्थायी निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. एकूण 309 सदस्यांचा समावेश या कार्यकारिणीमध्ये करण्यात आला आहे. पक्षाचे केंद्रीय पदाधिकारी, सर्व विभागांचे अध्यक्ष, राष्ट्रीय प्रवक्ते, सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधीमंडळातील नेते, माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, सर्व प्रदेशाध्यक्ष, सर्व राज्यांचे प्रभारी, सह प्रभारी आदींचा समावेश आहे. पक्षाचे 13 उपाध्यक्ष असतील. तर सात जणांवर राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com