डच्चू दिल्यानंतर वरूण गांधींचा विरोधी सूर; म्हणाले, राजकीय स्वार्थासाठी...

त्यांना गुरूवारी राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आलं.
डच्चू दिल्यानंतर वरूण गांधींचा विरोधी सूर; म्हणाले, राजकीय स्वार्थासाठी...
Varun Gandhi

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेचे व्हिडीओ ट्विटवर शेअर करत भाजपचे खासदार वरूण गांधींनी (MP Varun Gandhi) पक्षालाच अडचणीत आणले होते. त्यांच्या ट्विटनंतर काही तासांतच त्यांना गुरूवारी राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आलं. पण त्यानंतरही लखीमपूर घटनेवर त्यांनी रविवारी पुन्हा भाष्य केलं करत भाजपलाच घरचा आहेर दिल्याची चर्चा आहे.

भाजपने गुरूवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीमधून वरूण गांधींसह त्यांच्या आई खासदार मनेका गांधी यांनाही वगळण्यात आलं आहे. तर काही महिन्यांपूर्वी पक्षात दाखल झालेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व मिथुन चक्रवर्ती यांना कार्यकारिणीत घेण्यात आलं आहे. वरूण गांधी यांनी लखीमपूर खीरी येथील घटनेनंतर सातत्याने दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी घटनेचे दोन व्हिडीओ ट्विटवर शेअर केले आहेत. गुरूवारी सकाळीही एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी अजय मिश्रा यांना अडचणीत आणले आहे. आपल्या ट्वीटर वरुण गांधी यांनी घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Varun Gandhi
पंतप्रधान मोदी हुकूमशहा असल्याची टीका का? अमित शहांनीच सांगितलं कारण...

कार्यकारिणीतून वगळल्यानंतर वरूण गांधी यांनी रविवारी लखीमपूर घटनेवर पुन्हा ट्विट केले आहे. लखीमपूर खीरी येथील हिंसेनंतर या प्रकरणाला हिंदू विरूद्ध असे रूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे अत्यंत चुकीचे असून लोकांना भ्रमित करणाचा प्रयत्न आहे. अशाप्रकारचं वागणं धोकादायक आहे. यामुळे पुन्हा एकदा जखमा ताज्या होतील. राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रीय एकता पणाला लावू नये, असं गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, लखीमपूर खिरीमध्ये जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना चिरडण्याचा हा व्हिडिओ कोणालाही हादरवून टाकेल. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घ्यावी आणि या वाहनांचे मालक, त्यांमध्ये बसलेले लोक आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी गांधी यांनी केली होती. या ट्विटनंतर काही तासांतच भाजपनं कार्यकारिणीची घोषणा केली. त्यामध्ये वरूण गांधी यांना वगळण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

वरूण गांधी यांनी या प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही पत्र लिहिलं होतं. अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. लखीमपूर घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली होती.

Related Stories

No stories found.