हे म्हणजे हिरोशिवाय चित्रपटाचं पोस्टर बनवण्यासारखं! शशी थरूर संतापले

देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचं पोस्टरवर छायाचित्र नसल्यानं विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
MP Shashi Tharoor slams ICHR over 75 years of Independence poster
MP Shashi Tharoor slams ICHR over 75 years of Independence poster

नवी दिल्ली : देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या छायाचित्रावरून वाद निर्माण झाला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेनं (ICHR) एक पोस्टर काढलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडलेल्या अनेक नेत्यांची यावर छायाचित्र आहेत. पण नेहरू यांचं छायाचित्र नसल्यानं त्यावर टीका सुरू झाली आहे. (MP Shashi Tharoor slams ICHR over 75 years of Independence poster)

देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचं पोस्टरवर छायाचित्र नसल्यानं विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. सरकारकडून हे जाणीपूर्वक करण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली आहे. काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. पोस्टवर नेहरूंचं छायाचित्र नसणं म्हणजे हिरोशिवाय एखाद्या चित्रपटाचं पोस्टर तयार करण्यासारखं आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

त्या पोस्टरवर नेहरूंचं छायाचित्र असायला हवं, अशी मागणी करत थरूर यांनी इतिहासाल पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न होऊ नये, असंही म्हटलं आहे. थरूर यांच्याआधीही अनेक नेत्यांनी यावर टीका केली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, आयसीएचआरच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या उत्सवातून नेहरू यांचे छायाचित्र गायब होऊनही पंतप्रधान गप्प आहे. हे इतिहासाच्या विपरीत सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

आम्हाला माहिती आहे की, पंतप्रधान मोदी नेहरूंचा वारसा मिटवू इच्छितात. पण हे खूपच चुकीचं आहे, असंही रमेश यांनी म्हटलं आहे. नेहरूंचा पोस्टरवरील छायाचित्र नसल्याबद्दल आयसीएचआरने खुलासा करताना हे चुकून झाल्याचं म्हटलं आहे त्यावर पी. चिदंबरम यांनी हा खुलासा हास्यास्पद असल्याची टीका केली आहे. 

आम्ही स्वातंत्र्य लढ्यातील कुणाच्याही भूमिकेला कमी लेखत नाही. ज्या पोस्टरवरून वाद निर्माण झाला आहे, ते अनेक पोस्टरपैकी एक आहे. अमृत महोत्सवानिमित्त अशी अनेक पोस्टर तयार करण्यात आली आहेत. यापुढे प्रसिध्द होणाऱ्या पोस्टरवर नेहरू यांचं छायाचित्र असेल, असं परिषदेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com