केजरीवालांची रननीती : गुजरातच्या मैदानात उतरवला खास नेता

Arvind Kejriwal : पंजाब निवडणुकीतही होती महत्त्वाची जबाबदारी
Arvind Kejriwal Latest News
Arvind Kejriwal Latest News Sarkarnama

Arvind Kejriwal : नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने (AAP) खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राघव यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीतही राघव चड्ढा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंजाब निवडणुकीत पक्षाच्या विजयाचे बक्षीस म्हणून पक्षाने चढ्ढा यांची आगामी गुजरात (Gujarat) विधानसभा निवडणुकीसाठी सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

पंजाबच्या विजयाचे शिल्पकारही चढ्ढा होते. पंजाबमध्ये आपने 117 पैकी 92 जागा जिंकून 79 टक्के बहुमत मिळवले होते. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गुजरातमधील निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करण्यासाठी एका मोठ्या युवा नेत्याला उमेदवारी देणार असल्याचे म्हटले होते. त्यासाठी राघव चढ्ढा हे प्रामुख्याने पक्षाचा संभाव्य चेहरा होते. राघव चढ्ढा यांनी दिल्ली आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय चेहरा म्हणूनही पक्ष त्यांच्याकडे पाहतो. आम आदमी पक्ष गुजरात निवडणुकीत तरुणांना उत्तम शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या संधींसह चांगल्या भविष्याचे आश्वासन देत आहे.

Arvind Kejriwal Latest News
Uddhav Thackeray : सरनाईक भाजपच्या 'लॉण्ड्री'त आले, वेळेत कपडे धुऊन देण्यासाठी सरकारला घाई !

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता मिळवण्यात यशस्वी झालेल्या आम आदमी पक्षाचे पुढील मोठे लक्ष्य गुजरात आहे. अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही महिन्यांत राज्यात अनेक दौरे केले आहेत. त्यांनी सर्वांना नोकऱ्या, मोफत वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणांचे आश्वासन दिले.

दुसरीकडे, आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अरविंद केजरीवाल यांनी आज पुन्हा भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, सीबीआय, ईडी आमच्या नेत्यांच्या मागे लागले आहे. कारण भाजपला आम आदमी पार्टीला चिरडायचे आहे. गुजरातमध्ये आमच्या पक्षाची वाढती लोकप्रियता भाजप पचवू शकत नसल्याने, आमच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप लावले जात आहेत. ते म्हणाले की, 'आप'चे प्रामाणिक राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेले काम भाजपच्या पचनी पडणारे नाही, असा हल्लाहोल त्यांनी केला.

Arvind Kejriwal Latest News
'ते'स्क्रीनशॅाट अन् रेकॅार्डिंग सोशल मीडियावर टाकले तर पंतप्रधानही तोंड दाखवू शकणार नाही...

आम्ही मोफत सुविधा द्यायला सुरुवात केली. लोकांना मोफत सुविधा कशा द्यायच्या हे समजत नसल्याने भाजप विरोध करत आहे? जनतेला मोफत सुविधा दिल्याने देशाचा नाश होईल, असे अप्रामाणिक, भ्रष्ट आणि देशद्रोही माणूसच म्हणेल. पंतप्रधानांचे सल्लागार हिरेन जोशी यांनी गुजरातमधील अनेक वृत्तवाहिन्यांच्या मालकांना, संपादकांना 'आप'ला कव्हरेज न देण्याचा इशारा दिला, असा आरोपही केजरीवाल यांनी केला. मीडियाला धमक्या देणे बंद करा, गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुका जिंकून आम आदमी पार्टी सरकार स्थापन करणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in