राणा दाम्पत्याला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काय बोलणार?

भारतीय दंड संहितेतील कलम 124 अ हे देशद्रोहाचे कलम स्थगित ठेवण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.
राणा दाम्पत्याला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काय बोलणार?
Navneet Rana Ravi Rana Latest News, Navneet Rana Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : भारतीय दंड संहितेतील कलम 124 अ हे देशद्रोहाचे कलम स्थगित ठेवण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. त्यानंतर खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावली आहे. त्यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असून ते बारा दिवस तुरुंगात होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. त्यामुळे आज राणा दाम्पत्य काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे. (MP Navneet Rana Latest Marathi News)

देशद्रोहाच्या कायद्याचा पुनर्विचार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत या कायद्यांतर्गत एकही गुन्हा दाखल करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच सध्या दाखल गुन्ह्यांचा तपासही पुढे सुरू ठेवता येणार नाही. त्यामुळे ही प्रकरणे जैसे थे स्थितीत राहतील. त्याचप्रमाणे गुन्हे दाखल असलेले व सध्या तुरूंगात असलेले आरोपी न्यायालयात जामीनासाठी जाऊ शकतात. त्यावर संबंधित न्यायालयाने तातडीने निर्णय घ्यावा, असंही सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) म्हटले आहे.

Navneet Rana Ravi Rana Latest News, Navneet Rana Latest Marathi News
देशद्रोहाचे गुन्हे दाखल असलेल्यांनाही मिळणार दिलासा; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश

न्यायालयाच्या या निर्णयामुळे राणा दाम्पत्यालाही दिलासा मिळणार आहे. त्यांना या प्रकरणात आधीच जामीन मिळाला आहे. पण त्यांना जामीनासाठी काही अटी घातल्या होत्या. त्या अटींचे उल्लंघन केल्याने राज्य सरकार जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात गेले आहे. त्यामुळे त्यातूनही राणा दाम्पत्याच्या सुटका होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालानंतर राणा दाम्पत्याने दुपारी दोन वाजता दिल्लीत पत्रकार परिषद बोलावली आहे. या निकालावरून आता त्यांच्याकडून ठाकरे सरकारवर पुन्हा निशाणा साधला जाण्याची शक्यता आहे. तसेच लीलावती रुग्णालयाला पाठवण्यात आलेली नोटीस, घरातील अनधिकृत बांधकामाबाबत मुंबई महापालिकेने पाठवलेल्या नोटीशीवरही ते बोलण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देेशद्रोहाच्या कलमाच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. देशद्रोहाच्या कायद्यातील तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. केंद्र सरकारने या कायद्याला स्थगिती देणं योग्य होणार नाही, अशी भूमिका न्यायालयात मांडत पुनर्विचार करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने सरकारला धक्का देत कायद्यालाच स्थगिती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. (Sedition Law Latest Marathi News)

Navneet Rana Ravi Rana Latest News, Navneet Rana Latest Marathi News
Breaking : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; देशद्रोहाच्या कायद्याला स्थगिती

काय म्हटलं न्यायालयाने?

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा (N. V. Ramana), न्यायाधीश सुर्यकांत आणि न्यायाधीश हेमा कोहली यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. केंद्र सरकारची बाजू ऐकून घेत न्यायालयाने थेट कायद्याला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुनर्विचार होईपर्यंत या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होणार नाहीत. तसेच सध्या दाखल गुन्ह्यांचा तपासही पुढे सुरू ठेवता येणार नाही. त्यामुळे ही प्रकरणे जैसे थे स्थितीत राहतील. त्याचप्रमाणे गुन्हे दाखल असलेले व सध्या तुरूंगात असलेले आरोपी न्यायालयात जामीनासाठी जाऊ शकतात. त्यावर संबंधित न्यायालयाने तातडीने निर्णय घ्यावा, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया, अरूण शौरी, माजी लष्करी अधिकारी आणि महुआ मोईत्रा यांच्या याचिका आहेत. त्यावर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा (N. V. Ramana), न्यायाधीश सुर्यकांत आणि न्यायाधीश हेमा कोहली यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. आता जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पुढील सुनावणी होणार आहे. यावेळी केंद्र सरकारकडून कायद्याच्या पुनर्विचाराबाबत काय पावले टाकण्यात आली, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले जाऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.