आम्ही तुरूंगातून सुटून अभिमानाने घरी जातोय! राणा दांपत्याचा आजचा प्लॅन ठरलाय...

राणा दांपत्य शनिवारी 36 दिवसांनंतर अमरावतीमध्ये दाखल होणार आहे.
आम्ही तुरूंगातून सुटून अभिमानाने घरी जातोय! राणा दांपत्याचा आजचा प्लॅन ठरलाय...
Navneet rana | Ravi Rana|Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : हनुमान चालिसाच्या मुद्यावरून रान पेटवलेले राण दांपत्य शनिवारी (ता. 28) तब्बल 36 दिवसांनंतर अमरावतीत पाऊल ठेवणार आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नागपूर विमानतळावर उतरल्यापासून घरी जाईपर्यंत संपूर्ण प्लॅन ठरला आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर आम्ही अभिमानाने घरी जाणार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितले.

गेल्या महिन्याभरापासून हनुमान चालिसा पठणावर आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (MP Navnit Rana) विरुद्ध शिवसेना असा संघर्ष चांगलाच शिगेला पोहोचला आहे. दोघांनाही 14 दिवस तुरुंगात राहावे लागले आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर ते थेट दिल्लीला रवाना झाले. मधल्या काळात अनेक घडामोडी घडल्या. त्यानंतर आता शनिवारी ते अमरावतीत येणार आहे.

Navneet rana | Ravi Rana|Latest Marathi News
राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसा पठणाला पोलिस आयुक्तांनी परवानगी दिली, पण...

दोघेही दिल्लीतून विमानाने नागपूरकडे रवाना झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. 36 दिवसांनी घरी जात असल्याबद्दल बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, अमरावती हे माझं कुटुंब आहे. तेथील लोक आतुरतेने वाट बघत आहेत. मी 11-12 वर्षात पहिल्यांदाच अमरावतीपासून एवढे दिवस लांब राहिले आहे. तुरूंगात सुटूल्यानंतर लोकं निराश होऊन घरी जातात. पण आम्ही अभिमानाने घरी जाणार आहोत.

नागपूर विमानतळवर उतरल्यापासून घरी जाईपर्यंतचा राणा दांपत्याचे दिवसभराचे नियोजन ठरले आहे. विमानतळावर उतरल्यानंतर सुरूवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल. त्यानंतर रामनगरातील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण केले जाणार आहे.

Navneet rana | Ravi Rana|Latest Marathi News
गाड्यांच्या टाक्या फुल करा नाहीतर 31 तारखेला होईल परवड! हे आहे कारण...

तिथून मोझरी, गुरूकुल येथे समाधीचं दर्शन घेतलं जाईल. नांदगाव ते पंचवटीदरम्यान कार्यकर्त्यांकडून सत्कार केला जाणार आहे. अमरावतीत चौकाचौकात सत्कार होईल. अमरावतीत भव्य प्रमाणात हनुमान चालीस पठण केले जाईल. हनुमान चालीसा वाचून तुरुंगात नव्हे तर हृदयात जागा द्यावी, याचा आवाज मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीपर्यंत जाईल, असं रवी राणा यांनी सांगितले.

नागपूमध्ये राणा दाम्पत्याने विमानतळ ते मंदिरापर्यंत रॅली काढण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, ती परवानगी पोलिस आयुक्तांनी नाकारली आहे. दरम्यान, हनुमान चालीसा पठणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसलाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही गटांत वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी हनुमान चालिसा पठणासाठी बऱ्याच अटी, शर्थी टाकल्या आहेत. यामध्ये मंदिरासमोर कार्यकर्त्यांची गर्दी न करणे, मंदिरात निवडकांचा चालिसा पठणासाठी समावेश, कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य न करणे आदींचा समावेश आहे. या अटींचे पालन झाल्यास पोलिस आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in