'ते' सावकरांना राष्ट्रपिता म्हणून घोषित करतील ; राजनाथ सिंहांवर ओवैसी संतप्त

राजनाथ सिंह आणि असदुद्दीन ओवैसी ( Asaduddin Owaisi) यांनी परस्पर विरोधी वक्तव्य केल्याने सावरकरांविषयीचा राजकीय वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'ते' सावकरांना राष्ट्रपिता म्हणून घोषित करतील ; राजनाथ सिंहांवर ओवैसी संतप्त
Rajnath Singh,Asaduddin Owaisisarkarnama

मुंबई : ''महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी सांगितलं होतं म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानमध्ये तुरुंगात कैद असताना इंग्रजांकडे दया याचिका दाखल केली होती.' असा दावा आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर आता राजकारण पेटलं आहे. आता एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर संतप्त झाले आहेत. राजनाथ सिंह आणि असदुद्दीन ओवैसी ( Asaduddin Owaisi) यांनी परस्पर विरोधी वक्तव्य केल्याने सावरकरांविषयीचा राजकीय वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टि्वट करुन राजनाथ सिंह ( Asaduddin Owaisi) यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. “ते” सावरकरांना महात्मा गांधी यांना बाजूला सारून त्यांच्या जागी राष्ट्रपिता म्हणून देखील जाहीर करतील, अशा शब्दांत असदुद्दीन ओवैसी आपला संताप व्यक्त केला आहे. ''महात्मा गांधी यांच्या हत्येत ज्यांचा सहभाग होता, त्या सावरकरांना “हे लोक” राष्ट्रपिता म्हणून घोषित करतील आणि महात्मा गांधींना बाजूला सारतील. न्यायमूर्ती कपूर आयोगाने सावरकरांचा कसा सहभाग होता, याचे तपशीलवार वर्णन केले आहे,'' असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

Rajnath Singh,Asaduddin Owaisi
नाराज आमदारांना फडणवीस, शहा वन-टू-वन भेटणार

उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या 'वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राजनाथ सिंह यांनी असताना हे वक्तव्य केलं आहे. 'राष्ट्रीय नायकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि कार्याबद्दल वादविवाद होऊ शकतात, परंतु वीर सावरकरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांचा अपमान करणे हे सहन केले जाणार नाही. स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान हे काही विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केले.' असं म्हणत राजनाथ सिंह यांनी सावरकरांवर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.

गांधीजींच्या या सूचनेनंतरच सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती. त्यावेळी गांधींनी सावरकरांना ब्रिटिशांना सोडून द्यावं, असं आवाहनही केलं होतं. तेव्हा गांधीजींनी असंही म्हटलं होतं की, ज्याप्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत तशाच पद्धतीने सावरकर देखील स्वातंत्र्य चळवळ सुरु ठेवतील. पण त्यांना असं बदनाम केलं जातं की, सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती, क्षमायाचना केलेली किंवा आपल्या सुटकेची मागणी केली, असं राजनाथ सिंह म्हणाले.

Rajnath Singh,Asaduddin Owaisi
भाजपमध्ये मी मस्त, निवांत ; कोणतीही चौकशी नाही, शांत झोप लागते..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही या कार्यक्रमात सावरकरांच्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. मोहन भागवत म्हणाले, ''सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते. त्यांनी उर्दू भाषेत अनेक गझल लिहिल्या होत्या. त्याचवेळी भागवत यांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तानात जाणाऱ्या मुस्लिमांविषयी सावरकरांनी विचार मांडले होते.''

Related Stories

No stories found.