मुख्यमंत्र्यांना पराभूत केलं नाही तर राजकारण सोडणार! बड्या नेत्याची घोषणा

काही महिन्यांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे.
मुख्यमंत्र्यांना पराभूत केलं नाही तर राजकारण सोडणार! बड्या नेत्याची घोषणा
Abhishek Banerjeesarkarnama

कोलकाता : पुढील वर्षी देशातील काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होत आहे. त्यामुळं या राज्यांमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उत्तर प्रदेश, पंजाब अन् छत्तीसगड या राज्यांसह गोवा, त्रिपुरा या राज्यांमध्ये सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेसने (TMC) आता गोवा आणि त्रिपुरामध्ये सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.

तृणमूलचं लक्ष प्रामुख्याने त्रिपुरावर आहे. त्यासाठी अनेक नेत्यांचे राज्याील दौरे वाढले आहेत. पक्षानं भाजपसह काँग्रेसला झटके देण्यास सुरूवात केली आहे. त्यातच सोमवारी पक्षाचे नेते व खासदार अभिषेक बॅनर्जी यांनीही राज्याचा दौरा केला. यावेळी अगरतळा येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट मुख्यमंत्री बिप्लव कुमारे देव यांना आव्हान दिलं आहे.

Abhishek Banerjee
देशातील २५ राज्यांनी करून दाखवलं! ठाकरे सरकारला अजूनही जमेना...

बॅनर्जी म्हणाले, भाजपचे सरकार आता राज्यात शेवटचे काही दिवस मोजत आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना पराभूत केलं नाही, तर मी राजकारण सोडेन. भाजपचा झेंडा खाली उतरवायचा असेल, तर नागरिकांनी मतदान केंद्रांपर्यंत पोहचायलाच हवे. त्यांच्या गुंडांपासून तुमचा बचाव करण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावा. पण मतदान विकासाच्या बाजूने असलेल्या तृणमुललाच करा, असं आवाहन बॅनर्जी यांनी केलं.

त्रिपुरातील लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे पुढील विधानसभेत भाजपला खातंही खोलता येणार नाही, असं आव्हानही बॅनर्जी यांनी दिलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्रिपुरातील हिंसाचारावरून भाजप सरकारवर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेही भान सरकारला नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला जात आहे, असं त्या म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वी तृणमूलच्या नेत्यांच्या वाहनांवर त्रिपुरात हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. सर्वेक्षण करायला गेलेल्या एका खासगी संस्थेच्या लोकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावरूनही मोठं राजकारण तापलं होतं. त्यामुळे पुढील काही दिवस त्रिपुरामधील राजकीय वातावरण आणखी तापणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सयोनी घोष यांना जामीन

अभिनेत्री व टीएमसीच्या नेत्या सयोनी घोष यांना खूनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात स्थानिक न्यायालयानं सोमवारी जामीन मंजूर केला. पश्चिम त्रिपुरामधील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली. अगरतला पोलिसांनी रविवारी त्यांना अटक केले होते. त्यांच्यावर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in