ब्राझीलमध्ये हाहा:कार; एकाच महिन्यात एक लाखाहून अधिक मृत्यू - more than one lakh covid patients died in brazil in one month | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

ब्राझीलमध्ये हाहा:कार; एकाच महिन्यात एक लाखाहून अधिक मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

ब्राझीलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशातील रुग्णसंख्येसोबत मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. 

साओ पावलो : ब्राझीलमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. महिनाभरात कोरोनामुळे सुमारे १ लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ४ लाखांवर पोचली आहे. कोरोना मृत्यूंमध्ये ब्राझील जगात दुसऱ्या क्रमांकावर पोचला असून, आरोग्य तज्ञांनी ही परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा इशारा दिला आहे. ब्राझीलमध्ये जूनच्या मध्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. 

ब्राझीलमध्ये कोरोना संसर्गाने एप्रिल महिन्यात सर्वाधिक मृत्यू झाले. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यातील पहिल्या दोन दिवसांत चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. गेल्या दोन आठवड्यात दररोज २ हजार ४०० जणांचा मृत्यू होत आहे तर गुरुवारी ३ हजार 1 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील मृतांची संख्या ४ लाख १ हजार १८६ वर पोचली आहे. 

आरोग्य मंत्रालयाने संसर्गाचे प्रमाण आणि मृतांची संख्या आधीच्या तुलनेत काही प्रमाणात कमी झाल्याचे म्हटले आहे. देशात संसर्गाची आणखी एक लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ञांनी वर्तविली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या साथरोग तज्ञ वेंडरसन ओलिविरा यांनी जूनच्या मध्यापर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. ब्राझीलमध्ये लसीकरणाचे प्रमाण खूप कमी असून देशातील सहा टक्क्यांपेक्षा कमी लोकांना लस मिळाली आहे. सरकारचे गैरव्यवस्थापन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत असल्याची टीका होत आहे. 

ब्राझीलचे अध्यक्ष जेयर बोल्सोनारो यांनी सर्वांत शेवटी कोरोना लस घेण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध लागू करण्यासंदर्भात महापौर आणि गर्व्हनर यांच्यावर टीका करीत त्यांना लक्ष्य केले. 

भारतात दर तासाला 145 जणांचा कोरोनामुळे मृत्यू 
देशात आता दरतासाला सुमारे 145 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 87 लाख 62 हजार 976 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 8 हजार 330 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 86 हजार 452 रुग्ण सापडले असून, 3 हजार 498 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख