पदभार घेताच आयुष मंत्री म्हणाले, कोरोनापासून बचावासाठी मोदींचा योगा महत्वाचा! - Modis yoga have a big role in saving patients from COVID says Munjapara Mahendrabhai | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

पदभार घेताच आयुष मंत्री म्हणाले, कोरोनापासून बचावासाठी मोदींचा योगा महत्वाचा!

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जुलै 2021

हृदय शल्यचिकित्सक म्हणून त्यांनी तीन दशके वैद्यकीय क्षेत्रात करिअर केलं आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर आज बहुतेक नवीन मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आहे. खासदार मुंजपारा महेंद्रभाई यांच्याकडे आयुष मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनही आज पदभार स्वीकारला असून लगेचच वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कोरोनापासून रुग्णांना वाचवण्यात मोदींचा योग महत्वाचं ठरल्याचं ते म्हणाले आहेत. (Modis yoga have a big role in saving patients from COVID says Munjapara Mahendrabhai)

महेंद्रभाई हे गुजरातमधील सुरेंद्रनगर मतदारसंघातील भाजपचे खासदार आहेत. हृदय शल्यचिकित्सक म्हणून त्यांनी तीन दशके वैद्यकीय क्षेत्रात करिअर केलं आहे. तसेच गुजरामध्ये मेडिसीन विभागाचे ते प्राध्यापकही होते. जनरल मेडिसीनमध्ये त्यांनी गुजरात विद्यापीठातून एमडी. पदवी मिळवली आहे. सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. खासदार म्हणून ते पहिल्यांदाच निवडूण आले आहेत. 

हेही वाचा : नव्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अदर पूनावालांची सहा दिवसांपूर्वीच घेतली होती भेट

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांच्याकडे आयुष मंत्रालयाप्रमाणेच महिला व बाल विकास खात्याची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. त्यांनी आज दोन्ही खात्यांचा पदभार स्वीकारला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी मला कोणत्याही संकटाचा सामना करायला शिकवले आहे. काढ्यामुळे अनेक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनापासून बचावामध्ये होमिओपॅथी आणि मोदींचा योगा महत्वाचा ठरला आहे. विरोधी सदस्यांनी माझ्याकडून औषध घ्यावे, असे वक्तव्य महेंद्रभाई यांनी केलं आहे.  

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार झाला आहे. या पार्श्वभूमीवर 13 केंद्रीय मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. आरोग्यमंत्री असलेले हर्ष वर्धन (Harsh Vardhan) आणि कामगार राज्यमंत्री असलेले संतोषकुमार गंगवार (Santosh Kumar Gangwar) यांना कोरोना संकटाच्या हातळणीतील अपयश भोवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मंत्रिमंडळामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, दोन स्वतंत्र पदभार असलेले राज्यमंत्री तर 45 राज्यमंत्री आहेत. मंत्रिमंडळामध्ये अनेक महत्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. प्रकाश जावडेकर, डॅा. हर्ष वर्धन, रविशंकर प्रसाद यांच्यासारख्या बड्या नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. तर अनुराग ठाकूर, हरदीपसिंह पुरी, किरण रिजिजू आदी मंत्र्यांनी बढती मिळाली आहे. तसेच पियुष गोयल, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान आदी नेत्यांची खाती बदलण्यात आली आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख