मोदींच्या सुरक्षेतील निष्काळजीपणा अंगलट; पंजाब पोलिस महासंचालकाची बदली

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे बिगूल वाजले आहे.
Cm Charanjitsingh Channi- DGP Siddharth Chattopadhyay
Cm Charanjitsingh Channi- DGP Siddharth Chattopadhyay Sarkarnama

चंदीगड : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे बिगूल वाजले आहे. मार्च 2022 मध्ये उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), गोवा (Goa), मणिपूर (Manipur), उत्तराखंड (Uttarakhand) आणि पंजाब (Punjab) या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पंजाब विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर पंजाब सरकारने पंजाबचे डीजीपी सिद्धार्थ चट्टोपाध्याय (DGP Siddharth Chattopadhyay) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेतील त्रुटींमुळे बदली केली आहे.

आता सिद्धार्थ चटोपाध्याय यांच्या जागी वीरेश कुमार भवरा (Veeresh Kumar Bhavra) यांची पंजाबचे नवे डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाब सरकारने भवरा यांची डीजीपी पदावर नियुक्ती करण्याआधीच शनिवारी निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.

Cm Charanjitsingh Channi- DGP Siddharth Chattopadhyay
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा अखेर रद्द

- कोण आहेत वीरेश कुमार भवरा (Veeresh Kumar Bhavra)

पंजाबचे नवे पोलीस महासंचालक व्ही. के. भावरा हे 1987च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या डीजीपी होमगार्ड म्हणून तैनात आहेत. त्यांनी दक्षता प्रमुख म्हणूनही काम केले आहे. देशातील प्रसिद्ध पोलिस अधिकाऱ्यांमध्ये वीरेश भवरा यांची गणना होते.

मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्यावर पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींनंतर चौफेर टीका होत होता. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपनेही त्यावर राजकारण सुरु केले. त्यामुळे चरणजीत सिंह सरकारला हा निर्णय घ्यावा लागला.

Cm Charanjitsingh Channi- DGP Siddharth Chattopadhyay
मोदींच्या सुरक्षेत चुक हा पूर्वनियोजित कट ; किरण बेदींचा गंभीर आरोप

दरम्यान, यूपीएससीकडे पाठवण्यात आलेल्या पॅनेलमध्ये वीरेश भवरा यांचे नाव अव्वल ठरले आहे. 2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान संपूर्ण राज्यात सुरक्षा व्यवस्थेसाठी निवडणूक आयोगाने त्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. यावेळी भावरा यांची डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, सीएम चन्नी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू पंजाबमधील डीजीपीमुळे काहीसे नाराज होते आणि त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला होता. मात्र काही काळानंतर त्यांनी तो परत घेतला.

सोशल मीडियावर भयावह ट्रेंड;पाहा व्हिडिओ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com