मोदींचे बालमित्र अब्बास अली म्हणाले, अहमदाबादमध्ये आम्ही कधी भेटलोही नाही...

PM Narendra Modi|Abbas Ali : मोदींनी उल्लेख केलेले अब्बास अली हे सध्या सिडनीमध्ये राहतात.
PM Narendra Modi & Abbas Ali Latest News
PM Narendra Modi & Abbas Ali Latest NewsSarkarnama

PM Modi Friend Abbas Ali : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आपल्या आई हिराबेन मोदी (Hiraben Modi ) यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त एक खास ब्लॉग लिहिला आहे. या माध्यमातून त्यांनी काही आपल्या आठवणी शेअर केल्या आहेत.

त्यामध्ये त्यांनी बालपणीचे मुस्लिम मित्र अब्बास अली (Abbas Ali) यांच्याबद्दलच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. वडिलांचा एक जवळचा मित्र बाजूच्या गावात राहायचा. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर, वडिलांनी त्यांच्या मित्राच्या मुलाला म्हणजे अब्बासला आमच्या घरी आणले. आमच्यासोबत राहून त्याने शिक्षण पूर्ण केले, असे मोदींनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून म्हटलं आहे. मोदींच्या या ब्लॉगनंतर अब्बास नेमके कोण आहेत? यावरुन सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. (PM Narendra Modi & Abbas Ali Latest Marethi News)

PM Narendra Modi & Abbas Ali Latest News
'मिस्टर फडणवीस, तेरा घमंड तो चार दिन का है पगले..!'

मोदींनी उल्लेख केलेले अब्बास अली हे सध्या सिडनीमध्ये राहत असून अब्बास यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अब्बास म्हणाले की, मोदी यांच्या घरी ते एक वर्ष राहिले. तिथूनच मॅट्रिकची परीक्षा दिली. अब्बास यांचे वडील आणि मोदींच्या वडिलांची मैत्री होती. 4 किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव होते. मोदींच्या वडिलांनीच अब्बास यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या घरी आणलं होतं. त्यानंतर ते एक वर्ष ते मोदींच्या घरी राहिले. यामुळे त्यांनी तेथूनच मॅट्रिकचे शिक्षण घेतले.

PM Narendra Modi & Abbas Ali Latest News
भाजपमधील 60 आमदारांना खडसेंनी..! राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांचा मोठा दावा

अब्बास म्हणाले की, आम्ही त्यावेळी होळी, दिवाळी, ईद एकत्र साजरी करायचो. मोदी यांच्या मातोश्री ईदवेळी सेवई बनवायच्या. आज जसे वातावरण आहे तसे आधी नव्हते. होळी, दिवाळी एकत्र सेलिब्रेट करायचो. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्याकडून आपण कधीही मदत घेतली नाही. अहमदाबाद मध्ये राहत असून कधी भेटलो नाहीत. मोदी यांच्याशी कमीत कमी भेट झाली, असेही त्यांनी सांगितले आहे.

ब्लॉगमध्ये मोदी काय म्हणाले...

आईला इतर लोकांच्या आनंदात आनंद मिळत असे आणि ती खूप मोठ्या मनाची होती, असे मोदींनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. “वडिलांचा एक जवळचा मित्र बाजूच्या गावात राहायचा. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर, वडिलांनी त्यांच्या मित्राच्या मुलाला, अब्बासला आमच्या घरी आणले. आमच्यासोबत राहून त्याने शिक्षण पूर्ण केले. आई आम्हा सर्व भावंडांप्रमाणेच अब्बासची प्रेमाने काळजी घ्यायची. दरवर्षी ईदच्या दिवशी ती त्याच्या आवडीचे पदार्थ बनवत, अशी आठवण त्यांनी सांगितली. सणासुदीला, आजूबाजूची मुले आमच्या घरी यायचे आणि आईच्या हातच्या खास पदार्थांचा आस्वाद घ्यायचे, असेही मोदींनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com