मोदीजी कट्टरवाद्यांना आवरा...देशातील महत्वाच्या नेत्यांनी केले आवाहन..

Narendra Modi|BJP|Sharad Pawar : हिंसाचार झाला त्या सर्व भागांमध्ये हिंसा पसरवणाऱ्यांच्या मागे एक विशिष्ट सूत्र दिसत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
Narendra Modi
Narendra Modisarkarnama

नवी दिल्ली : रामनवमीच्या दिवशी झालेला हिंसाचार मशीदींवरील भोंगे काढण्यावरून सुरू झालेला वाद आणि देशात वाढणाऱ्या धार्मिक हिंसाचाराच्या घटना आणि कट्टरपंथाबद्दल 13 विरोधी पक्षीय नेत्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, सहिष्णुतेचे वातावरण कायम ठेवावे, असे कळकळीचे आवाहन देशवासीयांना केले आहे. काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी, (Soniya Gandhi) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार, (Sharad Pawar) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamta Banarjee) आदी नेत्यांनी देशात दोन धर्मांमध्ये हिंसाचार पसरवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे मौन हैराण करणारे आहे, असे स्पष्टपणे म्हटले आहे.

Narendra Modi
राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे व्हायचयं!

देशात कट्टरता पसरवणाऱ्या विरुद्ध काही कृती तर सोडाच पण काही बोलण्यातही पंतप्रधान मोदी हे अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून या नेत्यांनी या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, जे लोक आपले शब्द आणि कृती याद्वारे समाजाला भडकावण्याचे आणि चिथावण्या देण्याचे काम करीत आहेत, त्यामुळे देशातील माहोल अतिशय बिघडत आहे. हे वेळीच रोखले नाही तर सामाजिक स्वभावाला गंभीर परिणाम होतील. त्यामुळे सांप्रदायिक सौहार्द आणि शांततेला नख लावणाऱ्या अशा लोकांवर सक्त कारवाई करण्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे. लोकांच्या श्रद्धा, उत्सव, भाषा, खाणेपिणे कपडे अशा गोष्टींचा वापर खुर्द सत्ताधारी संस्थांतर्फे, ध्रुवीकरण करण्यासाठी प्रच्छन्नपणे करण्यात येत आहे. हे सारे दुःखद आहे हेही या निवेदनात लक्षात आणून देण्यात आले आहे. एका विशिष्ट समाजघटकाविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणे म्हणजेच हेट स्पीच देण्याचे वाढते प्रकार चिंताजनक आहेत. ज्यांना अधिकृतरित्या सरकारी संरक्षण प्राप्त आहे असे लोकच अशी द्वेषपूर्ण भाषणे देत आहेत आणि त्यांच्याविरुद्ध काही कारवाई देखील होत नाही, असेही या निवेदनात विरोधी नेत्यांनी नमूद केले आहे.

उत्तर प्रदेशात गोरखपूर हल्ल्याचा संबंध विदेशातील काही धार्मिक नेते आणि संस्था यांच्या कथित आवाहनाबरोबर आवाहनानंतर जोडून काही वृत्तवाहिन्यांनी अलीकडेच, हा केवळ एक की प्रयोग की योगायोग? असे वातावरण भडकवणारे वृत्त प्रसारित केले होते. रामनवमीच्या दिवशी किमान सहा राज्यांमध्ये हिंसाचार उफाळला, लाऊड स्पीकर वरून दिली जाणारी अजान कोणाच्या डोळ्यात खुपू लागली, मध्य प्रदेशातील खरगोन येथे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न झाला, सरकारच्याच बुलडोझरने अल्पसंख्यांकांची खुद्द पंतप्रधान आवास योजनेतील घरेदारेही उद्ध्वस्त केली, त्या सर्व घटनांचा मागोवा त्या वृत्तात सूचकपणे आणि एका विशिष्ट बाजूला झुकणाराच्या पद्धतीने घेण्यात आला होता.

Narendra Modi
हनुमान जयंतीच्या मिरणूकीवरील हल्ल्याबाबत संजय राऊतांचा गौप्यस्फोट

सोशल मीडियावर ही रामनवमीपासून भावना भडकवणाऱ्या पोस्ट वाढल्याचे निरिक्षण अनेक सामाजिक संस्थांनी नोंदवले आहे.

या पार्श्‍वभूमीवर विरोधी नेत्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, हिंसाचार झाला त्या सर्व भागांमध्ये हिंसा पसरवणाऱ्या यांच्या मागे एक विशिष्ट सूत्र दिसत आहे. सोशल मीडिया आणि ऑडिओ-व्हिज्युअल प्लॅटफॉर्मचा वापर एका धर्माविरुद्ध हिंसाचार आणि द्वेष पसरवण्यासाठी जाणीवपूर्वक केला जात आहे आणि अशा विषारी प्रचाराला अटकाव करण्याचे कोणतेही प्रयत्न सरकार नामक यंत्रणेकडून होत नाहीत, अशी भावना या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

समाजातील सर्व घटकांनी बंधुता, शांती आणि सौदार्ह यांचे वातावरण कायम ठेवावे आणि धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांचे इरादे हाणून पाडावेत, असेही आवाहन या विरोधी नेत्यांनी निवेदनात केले आहे.

या नेत्यांनी केले आवाहन...

 • सोनिया गांधी, अध्यक्ष

 • कांग्रेस शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी

 • ममता बनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

 • एमके स्टालिन, मुख्यमंत्री, तमिळनाडु

 • सीताराम येचुरी, महासचिव, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)

 • हेमंत सोरेन, मुख्यमंत्री, झारखंड

 • डॉ फारूक अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर

 • तेजस्वी यादव, विरोधी पक्षनेते, बिहार

 • डी. राजा, महासचिव, भारतीय कम्युनिस्ट पार्टी

 • देवव्रत विश्वास, महासचिव, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक

 • मनोज भट्टाचार्य, महासचिव, रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी

 • पी.के. कुन्हालीकुट्टी, महासचिव, आईयूएमएल

 • दीपांकर भट्टाचार्य, महासचिव भारतीय कम्युनिस्ट पार्टी (एमएल)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in