Lok Sabha MP : मोदी सरकारचा नवा प्लॅन?; देशातील लोकसभा-राज्यसभा खासदारांच्या संख्येत होणार मोठा बदल!

Parliament : नवे संसद भवन खासदारांच्या संख्येच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर तर बांधण्यात आली नाही ना?, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
Parliament
ParliamentSarkarnama

Political News : देशातील आगामी लोकसभा निवडणुका एका वर्षावर ऐवून ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच आगामी निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळणार आहेत. यातच आता लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या संख्येत मोठा बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जनगणनेनुसार मतदारसंघांच्या संख्येत वाढ किंवा घट होत असते. त्यामुळे 2026 नंतर मतदारसंघांच्या संख्येत मोठी वाढ होईल, अशी चिन्हे आहेत. यातच देशाची लोकसंख्या वाढली तरी त्या तुलनेत लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेतील प्रतिनिधीत्व कमी असल्याची चर्चा नेहमी होत असते. त्यामुळेच 2026 नंतर लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर मतदारसंघांची फेररचनाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Parliament
Maharashtra Politics : सुशीलकुमार शिंदे पुढे येताच विखे पाटलांनी केला चरणस्पर्श...

देशातील लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या संख्येची शेवटची रचना 1971 ला झाली होती. त्यानंतर मतदारसंघांची फेररचना झालेली नाही. मात्र, त्यानंतर देशाच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या जागांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. यानुसार संपूर्ण देशात लोकसभेचे 800 खासदार असू शकतात. तर राज्यसभेत 332 खासदार असण्याची शक्यता आहे.

यानुसार देशातील एकूण खासदारांची संख्या 1132 होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्रातील लोकसभेच्या खासदारांची सख्या सध्या 48 आहे. तर ही संख्या येणाऱ्या काळात 76 होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातील राज्यसभेचे सध्या 19 खासदार आहेत. तर ही संख्या येणाऱ्या काळात 31 होण्याची शक्यता आहे.

Parliament
Amol Kolhe in Satara : साताऱ्यात अमोल कोल्हे अन् देसाई, गोरे, पाटलांत रंगल्या गप्पा अन् कोपरखळ्या

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील नव्या संसद भवनाची चांगलीच चर्चा सुरू आहे. नव्या संसदेचे काही फोटो देखील समोर आले आहेत. त्यामुळे नवे संसद भवन या खासदारांच्या संख्येत होणाऱ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर तर बांधण्यात आली नाही ना?, तसेच खासदारांच्या संख्येत मोठी वाढ करण्याचा मोदी सरकारचा नवा प्लॅन तर नाही ना?, अशा चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र, खासदारांच्या संख्येच्या वाढीसंदर्भात अद्याप अधिकृत कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com