Rajpath Latest News
Rajpath Latest NewsSarkarnama

मोदी सरकार 'राजपथ'चे नाव बदलणार; आता 'या' नावाने आळखले जाणार

Rajpath : यापूर्वी मोदी सरकारने पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या रस्त्याचे नाव बदलले होते.

दिल्ली : केंद्र सरकार ( Central government) राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलण्याच्या प्रक्रियेत आहे. केंद्राकडून त्याचे नाव बदलून 'कर्तव्यपथ' असे नामकरण करण्यात येणार, असे बोलले जात आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा रस्ता 'कर्तव्यपथ' म्हणून ओळखला जाईल, याबाबतची माहिती एएनआयकडून ट्विटच्या माध्यमातून देण्यात आली आहे. (Rajpath Latest News)

Rajpath Latest News
रस्ते अपघातांना कोण जबाबदार?; गडकरींनी केला खुलासा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर रोजी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विजय चौक ते इंडिया गेट या संपूर्ण मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. राजपथाच्या बाजूने सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूमध्ये राज्यनिहाय खाद्यपदार्थांचे स्टॉल, सर्वत्र हिरवळ, ग्रॅनाइट वॉकवे, वेंडिंग झोन, पार्किंग लॉट्स आणि चोवीस तास सुरक्षा असेल.

Rajpath Latest News
खैरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना पटतील अशा तरी थापा माराव्यात...

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणारी संसद भवनाची नवीन इमारत सुमारे ६५,४०० चौरस मीटरमध्ये बांधली जाणार असून ती भव्य कलाकृतींनी परिपूर्ण असेल. ही इमारत त्रिकोणी रचना असेल आणि तिची उंची जुन्या इमारती इतकीच असेल. यात एक मोठा संविधान सभागृह, खासदारांसाठी विश्रामगृह, वाचनालय, अनेक समित्यांच्या खोल्या, जेवणाची जागा, असे अनेक कप्पे असतील. लोकसभेच्या चेंबरमध्ये 888 सदस्यांची आसनक्षमता असेल, तर राज्यसभेत 384 जागा असतील.

दरम्यान, आता राज्यकर्ते आणि प्रजेचे युग संपले,असा संदेश मोदी सरकारला या निर्णयामधून द्यायचा आहे. यापूर्वी मोदी सरकारने पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या रस्त्याचे नाव बदलून रेसकोर्स रोडचे नाव लोककल्याण मार्ग केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com