बिनधास्तपणे आता ड्रग्ज घेता येणार! मोदी सरकार आणतंय नवीन कायदा

अमली पदार्थासंदर्भात नवीन कायदा आणणार असल्याची माहिती आहे.
बिनधास्तपणे आता ड्रग्ज घेता येणार! मोदी सरकार आणतंय नवीन कायदा
Narendra Modisarkarnama

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार (Central Government) संसदेच्या हिवाळी (Parliament Session) अधीवेशनामध्ये अमली पदार्थासंदर्भात नवीन कायदा आणणार असल्याची माहिती आहे. अमली पदार्थासंदर्भातील विधेयक मंजूर झाल्यास अल्प प्रमाणात ड्रग्ज (Drugs) बाळगे हा गुन्हा मानला जाणार नाही, असे सांगितले जात आहे.

Narendra Modi
गुन्हा दाखल होऊनही गिरीश महाजन निर्धास्त कसे?, काय आहे कारण...

नवीन कायद्या संदर्भात दोन आठवड्या पूर्वी पंतप्रधान कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकरणातील शिफारसींवर निर्णय घेण्यात आला होता. बैठकीला महसूल, गृह विभाग आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, सामाजिक न्याय मंत्रालय व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नार्कोटिक्स ड्रग्ज सायकोट्रॅापिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) विधेयक, २०२१ अंतर्गत, अंमली पदार्थांचे वैयक्तिक सेवन गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर ठेवले जाईल. १९८५ च्या कायद्यातील कलम १५, १७, १८, २०, २१ आणि २२मध्ये सुधारणा केल्या जातील, असे सांगितले जात आहे.

या विधेयकात व्यक्तीने ड्रग्ज बाळगणे, खाजगीरित्या सेवन करणे आणि विक्री करणे यात फरक केला जाणार आहे. यामध्ये विक्री करणे हा गुन्हा मानला जाईल, मात्र, अत्यंत कमी प्रमाणात ड्रग्ज बाळगणे आणि वैयक्तिक वापर करणे गुन्ह्याच्या कक्षेत येणार नाही. ड्रग्ज कायद्यात बदल करण्याची मागणी अनेक सेलिब्रिटींनी केली होती.

Narendra Modi
मोदी सरकार अन् शेतकरी पुन्हा आमनेसामने; दिली नवी डेडलाईन

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण ड्रग्ज प्रकरणात ढवळून निघाले आहे. मुंबई क्रूड ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणी मोठे राजकारण रंगले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मिलक यांनी विविध आरोप करुन एनसीबीचे अधिकारी समिर वानखेडे यांना अडचणीत आणले आहे. या प्रकरणानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्येही वाद रंगला. केंद्र सरकार हे सगळे राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in