मोठी बातमी : मोदी सरकारच्या परराष्ट्र कुटनितीला मोठे यश

२० भारतीय मच्छिमारांना वाघा बॉर्डरपर्यंत आणून सोडणार
मोठी बातमी : मोदी सरकारच्या परराष्ट्र कुटनितीला मोठे यश
PM Narendra Modisarkarnama

कराची: केंद्रातील मोदी सरकारच्या कुटनितीला मोठे यश मिळाले असून त्यामुळे २० भारतीय मच्छिमार कैदी पाकिस्तानमधून आज पु्न्हा स्वगृही परतू शकले आहेत. गुजरातमधील रहिवासी असलेले ३५० कैदी कथितरित्या आंतरराष्ट्रीय समुद्र सीमा पार करुन पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानच्या समुद्र सुरक्षा एजन्सीकडून अटक करण्यात आले होते. यातील २० मच्छिमार कैद्यांना आता कराचीमधील लांधी कारागृहातून सोडून देण्यात आले आहे.

PM Narendra Modi
"१९४७ मध्ये मोदींसारखं नेतृत्व असतं तर भारत सर्वाधिक समृद्ध असता"

इधी ट्रस्ट फाऊंडेशनने या २० भारतीय मच्छिमारांना वाघा बॉर्डरपर्यंत आणून सोडण्याची जबाबदारी घेतली आहे. या एनजीओमधील एका सदस्यांने सांगितले की या २० जणांना काहीतरी भेट आणि काही पैसे देण्यात आले आहेत.

PM Narendra Modi
चंद्रकांत पाटील म्हणतात, कंगनाचे भिकेचे वक्तव्य चुकीचे पण...

यातील एका मच्छिमाराने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मी ४ वर्षांपासून पाकिस्तानमध्ये होतो. पाण्याच्या मार्गाने आम्ही चुकून सीमा ओलांडली होती आणि आम्हाला पकडण्यात आले होते. आता पाकिस्तान सरकारला देखील भारत सरकारशी बोलून भारतात अडकलेल्या आमच्या सारख्या त्यांच्या लोकांची सुटका करायला हवी.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in