
Assembly Elections 2023 tripura nagaland meghalaya: त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या तिन्ही राज्यातील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (गुरुवारी) दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोबाईल फ्लॅश लाईट लावून जल्लोष करीत पूर्वोत्तर राज्यातील जनतेला धन्यवाद दिले.
पूर्वोत्तर तीन राज्यांचा निकालानंतर पाच राज्यातील (कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीलगढ, तेलगंणा) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला बळ मिळाले आहे. या निकालानंतर आता भाजपने 'मिशन २००४'ची रणनीती अधिक मजबूत केली आहे.
नागालँडमध्ये मुख्यमंत्री नेफियू रियो यांच्या नॅशनल डेमोक्रेटिक प्रोगेसिव पार्टीसोबत भाजपने सत्ता राखली आहे. आता आगामी पाच राज्यात भाजप पुन्हा रिंगणात उतरणार आहे.
मोदी म्हणाले, "पूर्वोत्तर राज्यांचा विकास मला दिसत आहे. या राज्यांच्या विकासाचा काळ आता आला आहे. मी नुकताच तिथे जाऊन आलो तेव्हा, एकाने मला शुभेच्छा दिल्या की, मोदीजी तुम्हाला हाफ सेंच्युरीसाठी शुभेच्छा. मी विचारले कसली हाफ सेंच्युरी, तेव्हा त्यांनी सांगितले की पंतप्रधान झाल्यानंतर हा तुमचा पूर्वोत्तरचा ५० वा दौरा आहे,"
नागालँडमध्ये भाजपने निवडणुकीपूर्वी आकलन केले आणि एनडीपीपीसहम्हणून २० जागांवर निवडणूक लढवली. भाजप आघाडीचा येथे विजय झाला, पण पक्ष आपल्या जागा १२ च्या वर नेण्यात अपयशी ठरला. मेघालयातही भाजपने केवळ दोन जागा जिंकल्या. म्हणजेच ईशान्येतील या दोन्ही राज्यांत भाजपला आपले राजकीय महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक पक्षांचा आधार घ्यावा लागेल.
"पूर्वोत्तर राज्यातील निकालांचं यापूर्वी दिल्लीत फार कौतुक होत नव्हतं. इथं चर्चा व्हायची ती फक्त पूर्वोत्तर राज्यातील हिंसाचाराची. त्रिपुरामध्ये तर एका पक्षाच्या झेंड्याशिवाय दुसरा कोणाचा झेंडा तिथे फडकू शकत नव्हता. एखाद्याने वेगळा प्रयत्न केला तर त्याला रक्तबंबाळ केले जात होते.आता आम्ही एका वेगळ्या मार्गावर निघालेली पूर्वोत्तर राज्ये पाहात आहोत. दिल्ली आणि पूर्वोत्तरमध्ये आता मनोमिलन होत आहे. नव्या विचारांचा हा परिणाम आहे," असे मोदी म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.