फॅक्ट चेक : एअर इंडियाची मालकी टाटा समुहाकडे? काय म्हणाले मोदी सरकार...

केंद्र सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन विभागाने (दीपम) याबाबत ट्विट करून स्पष्टीकरण दिलं आहे.
Air India, Tata Group
Air India, Tata Group

नवी दिल्ली : सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाची (Air India) मालकी टाटा समूकाकडे गेल्याचे वृत्त शुक्रवारी सर्वच माध्यमांमध्ये झळकले. एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा समूहाने टाटा सन्स कंपनीने लावलेली वित्तीय बोली मोदी सरकारने स्वीकारल्याच्या बातम्या येत होत्या. पण त्यानंतर केंद्र सरकारकडून ही माहिती चुकीची असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन विभागाने (दीपम) याबाबत ट्विट करून स्पष्टीकरण दिलं आहे. 'सरकारने एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी वित्तीय बोलीला मंजूरी दिल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. या बातम्या चुकीच्या आहेत. याबाबत जेव्हा निर्णय होईल, त्याची माहिती माध्यमांना दिली जाईल,' असंही विभागानं स्पष्ट केलं आहे.

Air India, Tata Group
अजितदादांच्या उपस्थितीत होणाऱ्या 'सारथी'च्या बैठकीला शरद पवारांची अचानक हजेरी

दरम्यान, एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा समूह आणि स्पाईस जेट या दोन कंपन्यांनी वित्तीय बोली लावली आहे. सरकारने नुकतंच म्हटलं होतं की, टाटा आणि स्पाईस जेट च्या बोलींचे मूल्यांकन सुरू करण्यात आलं आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनीच्या खासगीकरणाची प्रक्रिया आता पुढील टप्प्यात पोहचली आहे. सरकार ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यासाठी उत्सूक आहे.

अघोषित आरक्षित मुल्याच्या आधारे वित्तीय बोलींचे मूल्यांकन केले जात आहे. ज्या बोलीमध्ये निश्चित मूल्याच्या अधिक किंमत दिली गेली असेल, त्या कंपनीची बोली स्वीकारली जाईल. टाटा कंपनीची बोली अधिक असल्यास एअर इंडिया 67 वर्षांनी पून्हा टाटाकडे जाईल. टाटा समूहाने ऑक्टोबर 1932 मध्ये टाटा एअरलाईन्सच्या नावाने एअर इंडियाची स्थापना केली होती. सरकारने 1953 मध्ये एअरलाईन्सचे राष्ट्रीयीकरण केले.

सरकारकडून एअरलाईन्समधील आपली 100 टक्के हिस्सेदारी विकत आहे. यामध्ये एअऱ इंडियातील 100 टक्के हिस्सा असलेली एआई एक्सप्रेस लि. आणि 50 टक्के हिस्सा असलेली एअर इंडिया एसएटीएस एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपन्यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com