Demonetisation: मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय एकतर्फी नव्हता; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

Modi Government Demonetisation: सर्वोच्च न्यायालयानं नोटाबंदीच्या निर्णयाविरोधातील सर्वच्या सर्व याचिका फेटाळल्या...
Narendra Modi, Demonetisation,
Narendra Modi, Demonetisation,Sarkarnama

Supreme Court On Modi Government Demonetisation: मोदी सरकारनं 2016 साली घेतलेल्या तडकाफडकी नोटबंदीच्या निर्णयावरुन काँग्रेससह विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येत होती. तसेच नोटबंदीविरोधात समाजातून देखील उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court) महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने 2016 साली घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर सोमवारी (दि.2) सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं महत्वपूर्ण दिला आहे. केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय योग्यच आहे असा निर्णय दिला आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही असेही मत नोंदवलं आहे.

सर्वोच्च न्यायालयानं नोटाबंदीच्या निर्णयाविरोधातील सर्वच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. तसेच नोटबंदी संबंधित घेतलेला निर्णय हा एकतर्फी नव्हता असं महत्वपूर्ण मत देखील व्यक्त केल आहे.

Narendra Modi, Demonetisation,
Aurangabad Teachers Constituency : आमदार विक्रम काळेंना राष्ट्रवादीतूनच आव्हान; वरिष्ठ पदाधिकारी बंडखोरीच्या तयारीत?

मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या निर्णयाविरोधात 2016 मध्ये विवेक शर्मा यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणात 58 अधिक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यातील तीन याचिकांवर सुनावणी करण्यात आली होती.

यावेळी न्यायालयानं नोटाबंदीचा निर्णय एकतर्फी झालेला नव्हता.तसेच आतंकवाद, ब्लॅकमनी रोखण्यासाठीच केंद्र सरकारनं नोटबंदी केली. मात्र, गेल्या 75 वर्षात कमीत कमी दोन वेळेस नोटाबंदी करण्यात आली आहे. आणि 2016 मध्ये मोदी सरकारनं तिसऱ्यांदा नोटाबंदी केली होती. हा निर्णय घेताना आरबीआय आणि केंद्र सरकारमध्ये सल्लामसलत झालं होतं.

तसेच नोटाबंदीचा निर्णय घेताना ज्या प्रक्रियेचा अवलंब केला गेला. त्यात काहीच कसूर नव्हती. त्यामुळे सरकारची ती अधिसूचना रद्द करण्याची आवश्यकता पडत नाही असं न्यायालयानं आपल्या आदेशात नमूद केलं आहे.

Narendra Modi, Demonetisation,
Sambhajiraje : ''अजित पवार अर्धसत्य बोलले, संभाजीमहाराज स्वराज्यरक्षकही आणि...''; संभाजीराजेंनी ठणकावलं

नोटाबंदी करण्यामागं काय होता उद्देश?

देशात नोटाबंदी आणण्यासाठी मोदी सरकारने अनेक कारणं दिली. यात काळा पैसा संपवणं. याशिवाय चलनात असलेल्या बनावट नोटा नष्ट किंवा रोखणं, कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना, दहशतवाद आणि नक्षलवादी कारवायांना आळा घालणं यांसारखी अनेक कारणं सांगण्यात देण्यात आली होती.

नोटाबंदीमुळे काय साध्य झालं?

नोटबंदीमुळे देशातील काळा पैसा संपेल आणि रोख व्यवहार कमी होतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र, नोटाबंदीनंतर पुढचे अनेक महिने देशात गोंधळाचं वातावरण होतं. जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणि नवीन नोटा घेण्यासाठी देशभरातील लोक बँकांमध्ये लांबच लांब रांगेत उभे होते. मात्र, तरीही रांगेत उभं राहूनही लोकांना पैसे मिळत नव्हते.

उद्योगक्षेत्राला सर्वाधिक फटका

नोटाबंदीचा सर्वात जास्त नुकसान औद्योगिक क्षेत्राचं झालं. कारण नोटबंदी अगोदर बहुतांश व्यवहार रोख स्वरुपात केले जात होते. मात्र, नोटबंदीच्या काळात या उद्योगांमध्ये रोखीचे व्यवहार बंद झाले आणि परिणामी रोख रकमेचा मोठा तुटवडा निर्माण झाला. यामुळे अनेक उद्योग धंदे ठप्प झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in