मोदी सरकारमुळे पद्म पुरस्कार प्राप्त कलाकारांवर बेघर होण्याची वेळ

Modi Government| PM Narendra Modi| भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत.
मोदी सरकारमुळे पद्म पुरस्कार प्राप्त कलाकारांवर  बेघर होण्याची वेळ
Guru Mayadhar Raut removed from govt accommodation

नवी दिल्ली : भारतरत्न (Bharatratna), पद्मश्री(Padma Shri), पद्मभूषण(Padma Bhushan) आणि पद्मविभूषण (Padma Vibhushan) हे आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. मात्र देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त कलाकारांची घरे रिकामी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कलाकरांना बेघर होण्याची वेळ आली आहे.

या निर्णयाचा पहिला फटका ओडिसी नृत्यकलेतील महान कलाकार (Odissi Dance Exponent) गुरू मायाधर राऊत (Guru Mayadhar Raut)यांना बसला आहे. मंगळवारी (26 एप्रिल 22) दुपारी सरकारी अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या घरातलं सामान रस्त्यावर टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Guru Mayadhar Raut removed from govt accommodation
मुख्यमंत्र्यासह अन्य नेत्यांना बॅाम्बनं उडवण्याची धमकी...

एका इंग्रजी वृत्त वहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, 1970पासून, सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त 40 ते 70 वयोगटातील कलाकारांना केंद्र सरकारच्या वतीने तीन वर्षांच्या मुदतीसाठी नाममात्र भाड्यानं घरांचं वाटप केलं जात होतं. 1980 च्या दशकात पद्म पुरस्कार प्राप्त कलाकारांना दिल्ली जवळील एशियाड व्हिलेजमधील निवासस्थानं देण्यात आली होती. त्यानंतर 2014 मध्ये त्याचीही मुदतवाढ संपल्यापासून या घरांमध्ये राहणारे कलाकार आणि सांस्कृतिक मंत्रालयादरम्यान सातत्यानं पत्र व्यवहार सुरू होते.

2020 मध्ये गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने ही घरे रिकामी करण्यासाठी कलाकारांना नोटिसा बजावल्या. या नोटीसांच्या विरोधात दिवंगत कथ्थक कलाकार पंडित बिरजू महाराज, कुचीपुडी गुरू जयरामा राव आणि मोहिनीअट्टम कलाकार भारती शिवाजी. ध्रुपद वादक वसीफुद्दीन डागर यांच्यासह इतर काही कलाकारांनी न्यायालयात धाव घेतली होती.

मंगळवारी (26 एप्रिल) गृहनिर्माण मंत्रालयाकडून निवासस्थाने (Government House) रिकामी करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. पद्मश्री पुरस्कार प्राप्त (Padma Shri Awardee) गुरू मायाधर राऊत यांच्या निवासस्थानावर पहिली कारवाई झाली. अधिकारी पोहचले तेव्हा त्यांची मुलगी आणि ओडिसी नृत्यांगना मधुमिता राऊत मायाधर राऊत यांना जेवण वाढत होत्या. मात्र तरीही अधिकाऱ्यांनी घरातून सामान रस्त्यावर टाकण्यास सुरुवात केली.

गुरू मायाधर यांनी, सोनल मानसिंग आणि राधा रेड्डी यांसारख्या दिग्गज नर्तकांना प्रशिक्षण दिलं आहे. गेल्या 50 वर्षांपासून ते दिल्लीत नृत्य शिकवण्याचं काम करत आहेत. त्यांच्या नावे कुठेही एक इंचभर जमीनही नाही. असे असतानाही माझ्या वडिलांसारख्या दिग्गज कलाकाराला अतिशय वाईट वागणूक दिली जात असल्याची भावना मधुमिता राऊत यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.